त्रासदायी वाहतुक काेंडी

नवी मुंबई शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर देखील दुतर्फा वाहनांची पार्कींग करण्यात येत असल्याने नवी मुंबईमध्ये सर्वत्रच वाहतुक काेंडीचा प्रश्न बिकट बनत चालला असून, या वाहतुक काेंडीचा प्रवाशांना, नागरिकांना तसेच वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाशी ते कोपरखैरणे दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा वाहने पार्क करण्यात येत असल्याने १५ मिनिटांच्या प्रवासाला ३०-३५ मिनिटे लागत आहेत. नवी मुंबई शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहने पार्क करुन वाहतुक काेंडी होऊ नये म्हणून नवी मुंबई वाहतुक पोलीस विभाग तपेÀ नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ‘नो पार्विंÀग झोन’ तयार करण्यात आले आहेत. या ‘नो पार्विंÀग झोन’ मध्ये वाहने पार्क केली तर वाहन चालकांवर वाहतुक पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र, ‘नो पार्विंÀग झोन’ मध्ये पार्क करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याच्या नियमाची सातत्याने अंमलबजावणी वाहतुक पोलिसांकडून होत असल्याचे चित्र दिसत नाही. परिणामी नवी मुंबई शहरातील सर्वत्र मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांच्या दोन्ही बाजुला वाहने उभी केली जात आहेत. कोपरीगाव येथील पामबीच मार्गावर पावनेश्वर उड्डाणपुल ते हनुमान मंदिर सिग्नल आणि अरेंजा कॉर्नर सिग्नल र्पयंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला ‘नो पार्विंÀग झोन’ आहे. मात्र, या रस्त्यावर ‘नो पार्विंÀग झोन’ असून देखील जुनी वाहन विक्रेते रस्त्याच्या दुतर्फा त्यांची वाहने विक्री करण्यासाठी उभी करत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुक काेंडी होऊन सामान्य वाहन चालकांना नाहक त्रास होत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून ‘नो पार्विंÀग झोन’ मध्ये वाहने पार्क करणाऱ्या वाहन विक्रेते आणि व्यावसायिकांविरुध्द एपीएमसी वाहतुक पोलीस शाखा आणि नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करण्यात येत आहेत. मात्र, ‘नो पार्विंÀग झोन’ मध्ये पार्क करण्यात येणाऱ्या वाहनांवर वाहतुक पोलिसांकडून सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याने ‘नो पार्विंÀग झोन’ मध्ये वाहने पार्क करणाऱ्या वाहन विक्रेत्यांचे फावले असून, वाहन विव्रÀेत्यांनी एक सोडून दोन दोन लेन मध्ये वाहने पार्क करायला सुरुवात केली आहे. परिणामी याठिकाणी सर्वसामान्य वाहन चालकांना वाहतुक काेंडीचा रोज सामना करावा लागत आहे. ‘नो पार्विंÀग झोन’ मध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर वाहतुक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. मात्र, या कारवाईमध्ये सातत्य नसते. वाशी ते बेलापूर दरम्यानच्या ‘क्वीन नेकलेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामबीच मार्गावर कोपरी गाव येथे रस्त्याच्या दुतर्फा नो पार्किंग झोन असून देखील बेकायदेशीरपणे वाहने पार्क केली जात आहेत. वाहतुक पोलिसांनी कारवाईत सातत्य ठेवले तरच रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहने उभी करण्याचे प्रकार थांबतील. अन्यथा रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहने बिनदिक्कतपणे उभी करण्याचे प्रकार सुरुच राहतील.  पामबीच मार्गासह नवी मुंबई मधील मुख्य आणि अंतर्गत रस्ते मोकळा श्वास घणार कधी?. नवी मुंबई शहरातील नागरिकांनी त्रासदायी ठरणारी वाहतुक काेंडीची समस्या संपुष्टात आणायची कोणी?. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

 उष्णतेची ही लाट धोकादायक