मालमत्ताकर थकबाकीदारांना दिलासा


नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मालमत्ता कर अभय योजनेस ३१ जानेवारी २०२२ र्पयंत अंतिम मुदतवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. यापूर्वी १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत थकीत मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम अधिक २५ टक्के दंडात्मक रक्कम भरल्यास ७५ टक्के दंडात्मक रक्कम माफ करण्यात येत होता. आता थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर ७५ टक्के सूट देणाऱ्या महापालिकेच्या ‘मालमत्ता कर अभय योजना’ला आणखी मुदतवाढ देण्यात आल्याने मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी नवीन संजीवनी ठरणार आहे. महापालिकेची मोठ्या रक्कमेची मालमत्ताकर थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांना मालमत्ता जप्ती आणि लिलाव नोटीस बजावूनही २१ दिवसांच्या नोटीस कालावधीत दखल न घणाऱ्या थकबाकीदारांविरुध्द महापालिका तपेÀ कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यापूर्वीच घतला आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत मालमत्ताकर असून, मालमत्ताकर स्वरुपात मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातूनच नागरी सोयीसुविधांची पूर्तता महापालिका द्वारे करण्यात येते, याची जाणीव असलेले नवी मुंबई शहरातील अनेक नागरिक प्रामाणिकपणे महापालिकेचा मालमत्ताकर नियमित भरत असतात. तथापि काही निर्ढावलेल्या व्यक्ती महापालिकेचा मालमत्ताकर भरण्यास टाळाटाळ करतात. नवी मुंबईकरांनी मालमत्ताकर जमा करावा याकरिता महापालिका तपेÀ मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर करुन आणि अभय योजनेस मुदतवाढ देऊनही त्या सवलतीचा लाभ अनेक मालमत्ताकर थकबाकीदार घत नाहीत. त्यामुळे मालमत्ताकर थकबाकीदारांना महापालिका द्वारे जप्ती आणि लिलाव कार्यवाहीची नोटीस बजावण्यात येते. मात्र, अनेक मालमत्ताकर थकबाकीदार जप्ती आणि लिलाव नोटीसची देखील दखल घत नाहीत. त्यामुळे जप्ती आणि लिलाव नोटीसची दखल न घणाऱ्या मालमत्ताकर थकबाकीदारांविरुध्द कायदेशीर जप्ती आणि लिलावाची कारवाई करण्याचा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा निर्णय योग्यच आहे. मालमत्ताकर महापालिकेचा मुख्य उत्पन्न स्त्रोत आहे. मोठ्या रक्कमेच्या मालमत्ताकर थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटीसा महापालिका द्वारे बजाविण्यात येत आहेत. मात्र, मालमत्ता जप्ती आणि लिलावाची कटू कारवाई टाळण्यासाठी मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी महापालिका तपेÀ पुन्हा ३१ जानेवारी २०२२ र्पयंत ‘मालमत्ता कर अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे. ‘मालमत्ता कर अभय योजना’चा लाभ थकबाकीदारांनी घऊन मालमत्ताकराची थकीत रक्कम भरली तर ते नवी मुबई शहरातील नागरिकांच्या हिताचेच ठरणार आहे. महापालिका द्वारे मालमत्ता कर थकबाकीदारांना रितसर नोटीसा बजाविण्यात येत आहेत. त्यामुळे महापालिकेचा मालमत्ता कर भरण्याशिवाय नागरिकांकडे दुसरा पर्याय नाही. मालमत्ता कराद्वारे जमा होणाऱ्या महसूलातूनच महापालिका तपेÀ नागरी सुविधांची पूर्तता करण्यात येत असल्याने मालमत्ताकर भरणे प्रत्येक मालमत्ताकर धारकाचे कर्तव्यच आहे. या कर्तव्याचा विसर पडू न देता मालमत्ताकराची थकबाकी भरणे हेच मालमत्ताकर थकबाकीदारांच्या हिताचे आहे. ‘महापालिका पुरवित असलेल्या सुविधांचा लाभ घ्यायचा पण महापालिकेचा मालमत्ता कर भरायचा नाही’, या मानसिकतेतून नवी मुंबई मधील मालमत्ता धारकांनी बाहेर पाडण्याची गरज आहे. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

मुली-महिला असुरक्षित