बेकायदा बांधकामांचे उद्योग कायम

नवी मुंबई महापालिका प्रशासनाची कोणतीही पुर्वपरवानगी न घता करण्यात येणारी अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाई महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत असली तरी देखील नवी मुंबई शहरामध्ये बेकायदा बांधकामे करण्याचे भूमाफीयांचे उद्योग काही थांबले असल्याचे चित्र दिसत नाही. नवी मुंबई शहरात महापालिका प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अनधिकृत करण्याचे सत्र सुरुच आहे. नवी मुंबई शहरामध्ये  नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घत भूमाफिया अनधिकृत इमारतींचे इमले रातोरात उभारत आहेत. नवी मुंबईमध्ये सध्या ‘कोरोना’च्या वेगाने अनधिकृत इमारती बांधण्याचे काम भूमाफिया पूर्णत्वास नेत आहेत. मात्र, बेकायदेशीर इमारती बांधताना भूमाफिया स्वार्थापोटी वाहनतळाची व्यवस्था इमारतीच्या तळमजल्यावर करत नसल्याने नवी मुंबई महापालिका हद्दीतील अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये वाहन पार्कींग करण्यावरुन मोठ्या प्रमाणात खटके उडत असल्याच्या घटना नियमितपणे घडत आहेत. त्यामुळे, अनधिकृत इमारतीत घरे घणाऱ्या नागरिकांवर आता रोजच भांडणे ऐकण्याची वेळ आली आहे. नवी मुंबई महापालिका आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील सिडको, एमआयडीसी, वन विभाग हद्दीतील भूखंडावर आणि चाळींच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचा सिलसिला चालू आहे. सध्या मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या ‘कोरोना’च्या प्रादुर्भावात महापालिका प्रशासन ‘कोरोना’ला अटकाव करण्यात गुंतल्याने भूमाफियांना आयतेच मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळे जलदगतीने अनधिकृत इमारती बांधल्या जात आहेत. विशेष म्हणजे अनधिकृत इमारतीत घरे घण्यासाठी नागरिकांचा प्रतिसादही चांगला आहे. इमारतीत घर घणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडे  किमान दुचाकी वाहन तर असतेच असते. मात्र, अनधिकृत इमारतीत वाहन तळसाठी भूमाफिया जागा ठेवत नसल्याने अनधिकृत इमारतीत घर घणाऱ्या वाहनधारकांना ‘वाहन पार्कींग करायचे कोठे?’, असा प्रश्न सतावत आहे. सध्या पार्कींगचा प्रश्न मोठा झाला असताना अजूनही नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती उभ्या राहत आहेत. नवी मुंबई शहरामध्ये उभ्या राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांना महापालिका तपेÀ महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजाविण्यात येते. त्यानंतर संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटविले नाही तर त्या बेकायदा बांधकामावर महापालिका तपेÀ तोडक कारवाई करण्यात येते. मात्र, महापालिका कारवाई करीत असताना देखील नवी मुंबई शहरात अनधिकृत बांधकामे होत आहेत, याला कशाचे लक्षण समजायचे?. नवी मुंबई शहरात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांना, अतिव्रÀमणांना भूमाफिया आणि महापालिका अधिकारी यांची युती तर कारणीभूत नाही ना, याचा गांभियाने विचार होणार कधी?. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

 मालमत्ताकर थकबाकीदारांना दिलासा