स्वागतार्ह कारवाई

नवी मुंबई महापालिका प्रशासनाची परवानगी न घता करण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामांमुळे नवी मुंबई शहराला बकाल स्वरुप प्राप्त होत असल्याचे लक्षात घऊन माफिया वृत्तीने अनधिकृत बांधकामे करणाऱ्या व्यक्तींविरुध्द कठोर कारवाई करावी तसेच अनधिकृत बांधकामांची तक्रार आल्यावर त्यावर कारवाई करण्याऐवजी विभागातील घडामोडींकडे जागरुकतेने लक्ष देत अनधिकृत बांधकामे सुरु असल्याचे आढळल्यास त्या बांधकामांवर धडक कारवाई करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्याने नवी मुंबई शहरात भूमाफीयांकडून करण्यात येणाऱ्या बेकायदा बांधकामांना चाप बसेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा असूनही नवी मुंबई मध्ये अनधिकृत बांधकामे राजरोसपणे होत आहेत. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी अनधिकृत पध्दतीने बहुमजली इमारती उभारल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने महापालिका आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करणे स्वाभाविकच आहे. १ जून २०२१ पासून महापालिका द्वारे ९७ अनधिकृत बांधकामांना नोटीसा बजाविण्यात आल्या असून, नोटीशींना विहित कालावधीत प्रतिसाद न देणाऱ्या ४८ अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. यावरुन नवी मुंबई शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव कसे फुटले आहे, याचा अंदाज यायला हरकत नाही. खरेतर नवी मुंबई शहरात अनधिकृत बांधकामे फोफावली गेली आहेत. त्यामुळेच नवी मुंबई मधील अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी आता दस्तुरखुद्द महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनीच कंबर कसली आहे.  विभागीय क्षेत्रात अधिक जागरुकतेने बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण करावे, अतिक्रमण विभाग अभियंत्यांनी आपपल्या क्षेत्रात फिरत राहून अनधिकृत बांधकामांबाबत दक्ष राहून नवीन अनधिकृत बांधकामे होणारच नाहीत याची दक्षता घतानाच होत असलेल्या बेकायदा बांधकामांवर नोटीसा बजावून कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश देतानाच, संपूर्ण यंत्रणेला गृहित धरुन किंवा संबंधितांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे जर अनधिकृत बांधकामे फोफावत असतील तर जबाबदारी निश्चित केली जाईल, असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केल्याने महापालिका द्वारे अनधिकृत बांधकामांवर होणाऱ्या कारवाईमध्ये यापुढे सातत्य राखले जाईल, अशी अपेक्षा आहे. अतिक्रमण विरोधी कारवाई सर्क्रिंना समान न्याय या पध्दतीने होईल, याचे भान ठेवून काम करावे आणि अनधिकृत बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले असल्याने महापालिका अधिकारी-कर्मचारी यापुढे अनधिकृत बांधकामांबाबत काय भूमिका घतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अनधिकृत बांधकामांमुळे शहराच्या नियोजनबध्द विकासाला बाधा पोहचून नागरी सुविधांवर ताण पडतो तसेच बेकायदेशीर इमारतींमध्ये रक्कम गुंतविणाऱ्या नागरिकांचीही मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी होते. त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये होणारी बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी उचललेले कारवाईचे पाऊल नागरीक हिताय असेच आहे. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

 बेकायदा बांधकामांचे उद्योग कायम