एमआयाडीसीच्या भूखंडावर अतिक्रमण करुन पक्ष कार्यालय थाटन्याचा घाट ?

नवी मुंबई-: पावणे गावाजवळ असलेल्या मनपा आरोग्य केंद्राशेजारी एका राजकीय नेत्याकडून एमआयडीसीच्या भुखंडावर अतिक्रमण केले असुन या ठिकाणी पक्षाचे कार्यालय थाटण्याचा घाट घातला जात आहे.त्यामुळे सदर भुखंड अतिक्रमण मुक्त करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

औद्योगीक वसाहत वसवण्यासाठी राज्य शासनाने नवी मुंबईतील शेतकऱ्यांची जमीन संपादीत करुन या  एमआयडीसी वसवली.मात्र एमआयडीसी मार्फत आरेखन केलेल्या सर्वच भुखंडांवर कंपन्या न बनल्याकारणाने एमआयडीसीच्या बहुतांश भुखंडांवर अतिक्रमण होऊन झोपडपट्टी दादांकडून मतांच्या बेरजेसाठी झोपडपट्ट्या वसवल्या गेल्या आणि कित्ता आजही सुरू आहे.पावणे गावानजीक  मनपा आरोग्य केंद्राशेजारी एमआयडीसी चा एक मोकळा भुखंड आहे. आणि सदर भुखंडावर  अतिक्रमण करू नये असा फलक एमआयडीसिने लावला होता.मात्र एका राजकीय नेत्याची नजर या भुखंडावर पडली असून।त्याच्या कार्यकर्त्यामार्फत एमआयडीसीचा फलक हटवुन या ठिकाणी अतिक्रमण करत पक्ष कार्या लय बाधण्याचा घाट घातला जात आहे.त्यामुळे एमआयडीसीने सदर  भुखंडावरील होणारे अतिक्रमण थांबवावे अशी मागणी पावणे गावातील स्थानिक नागरीक करीत आहेत.तर सदर भूखंडावर स्थळ पाहणी करून या ठिकाणी जर अतिक्रमण होत असेल किंवा केले असेल तर तयार उचित कारवाई केली जाईल असे उत्तर एमआयडीसीचे उपअभियंता येऊ एस कळसकर यांनी दिली.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबईतील गावागावात दि. बा. पाटील यांची जयंती साजरी