महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून आंदोलन

नवी मुंबई-: मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीमार्फत आधीच कार्यरत असलेल्या मापाडी कामगारांना डावलून परस्पर कंत्राटी कामगार नेमणुकीकरीता खाजगी एजन्सीमार्फत नेमणुकीची प्रकिया सुरू आहे. त्यामुळे ही  प्रक्रिया त्वरीत थांबवुन मापाडी कामगारां बाजार समितीच्या सेवेत त्वरीत समावुन घेण्यात यावे अशी मागणी करत एपीएमसी बाजार समितीसमोर महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले.

एपीएमसी बाजार समितीच्या कांदा-बटाटा, भाजीपाला व फळमार्केट आवारात तोलाईची कामे करणारे व राज्य शासनाच्या मुंबई भाजीपाला बाजार असंरक्षित कामगार मंडळात नोंदीत असलेले ३५७ मापाडी कर्मचारी आहेत.

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेपासुन मापाडी कर्मचारी हे तोलाईची कामे करीत असून, बाजार समिती या मापाडी कर्मचान्यांच्या नांवे शासनाच्या मुंबई भाजीपाला बाजार असंरक्षित कामगार मंडळात "मालक" म्हणुन नोंदीत आहे. सदर मापाडी कर्मचाऱ्यांना मिळणारे दरमहा वेतन हे अत्यंत कमी झाल्याने व आपली बाजार समिती मापाडी कर्मचान्यांच्या नांवे माथाडी मंडळात "मालक" म्हणून नोंदीत असल्याने मापाडी कर्मचाऱ्यांना बाजार समितीच्या सेवेत कायमस्वरुपी समावुन घेण्यात यावे, यासाठी आमच्या संघटनेमार्फत वारंवार मागणी करण्यात आलेली आहे. त्याअनुषधाने याबाबत शासकीय स्तरावर अनेक बैठका झालेल्या असून, सहकार व पणन खात्याकडून मापाडी कर्मचाऱ्यांना बाजार समितीच्या सेवेत समाविष्ट करुन घेण्यासाठी यापुर्वीच आदेश दिलेले आहेत. परंतु आजपर्यन्त एपीएमसीकडुन मापाडी कर्मचा-यांना बाजार समितीच्या सेवेत समाविष्ठ करून घेण्याबाबत कोणतीही प्रक्रिया करण्यात आलेली नाही. याउलट बाजार समितीमध्ये कर्मचारी संख्या कमी झाल्याने बाजार समिती कंत्राटी कामगार नेमणुकीकरीता खाजगी एजन्सीची नेमणुक प्रक्रिया  राबवत असल्याचे समोर येत आहे.त्यामुळे अशा प्रकारे कंत्राटी कामगार नेमुणकीसाठी  खाजगी एजन्सी नेमल्यास यापुढे कधीही मापाडी कर्मचाऱ्यांना बाजार समितीमध्ये समावुन घेणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.त्यामुळे मापाडी कर्मचान्यांना बाजार समितीच्या सेवेत समाविष्ठ करुन घेण्याचे आदेश असताना देखिल आपण अशा प्रकारे खाजगी एजन्सीची नेमुणक प्रक्रिया सुरु आहे., म्हणून ही प्रकिया रद्द करूनमापाडी कामगारां बाजार समितीच्या सेवेत त्वरीत समावुन घेण्यात यावे अशी मागणी करत एपीएमसी बाजार समितीसमोर  महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल   कामगार युनियनच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

एमआयाडीसीच्या भूखंडावर अतिक्रमण करुन पक्ष कार्यालय थाटन्याचा घाट ?