एपीएमसीत सुरक्षित अंतराचा फज्जा

 नवी मुंबई-: राज्यात ओमायक्रोन या कोरोनाची तिसरी लाट निर्माण असून शासनाने पुन्हा एकदा कडक  निर्बंध लादले आहेत.मात्र  निर्बंधांच्या पहिल्याच दिवशी   एपीएमसी बाजार आवारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडून सुरक्षित अंतराचे तीनतेरा वाजवत पुन्हा एकदा गर्दी करण्यास सुरूवात केली आहे.

नवी मुंबईत देखील कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ होत असून रोज २ हजाराच्या वर रुग्ण वाढळत आहेत.तर कोरोनाच्या पहील्या लाटेत  एपीएमसी मार्केट चा मोठा वाटा होता.त्यानुसार एपीएमसी।बाजार आवारात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवण्यासाठी मनपा आयुक्तांनी निर्देश दिले होते. मात्र कोरोनाची दुसरी लाट ओसरतास या उपाययोजना राबवण्यात एपीएमसी प्रशासनाने कानाडोळा केला होता.मात्र आता पुन्हा एकदा ओमायक्रोन ने डोकं वर काढले आहे.त्यामुळे 

राज्यात ओमायक्रोन चे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध लादत संचार बंदी  व जमाव बंदिचे आदेश दिले आहेत.१० जानेवारी मध्यरात्री पासून हे आदेश लागू केले आहेत.त्यानुसार पहाटे ०५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमाव बंदी असेल रात्री ११ ते।पहाटे पर्यत संचार बंदी असेल.मात्र संचार बंदी आणि जमाव बंदी आदेश असून देखील एपीएमसी बाजार आवारात ग्राहकांनी खरेदीसाठी एकच गर्दी करत सुरक्षित अंतराचे तीनतेरा वाजवले .तर सदर गर्दी रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष होत असल्याने बाजार आवारात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो.

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

थंडीच्या धुक्याआडून कारखानदारांकडुन  वायू प्रदूषण