थंडीच्या धुक्याआडून कारखानदारांकडुन वायू प्रदूषण
नवी मुंबई -; मागील दोन तीन दिवसांपासुन तापमानात घट झाल्याने धुक पडून थंडी वाढली आहे.मात्र रात्री पडणाऱ्या धुक्याचा गैरफायदा।घेत एमआयडीसीतील रसायन कारखानदारांनी प्रदूषित वायु सोडण्याचा सपाटा लावला आहे.त्यामुळे खैरणे, कोपरी भागात रात्रीच्या वेळी दर्पवासाने नागरीकांना मळमळ झाल्यासारखे व श्वास घेण्यास अडचण वाटत होते.
त्यामुळे ओमायक्रोनच्या या महामारीत नागरीकांच्या आरोग्यास आणखी धोका निर्माण झाला आहे. नवी मुंबईतील रबाले ,महापे व पावणे औधोगिक क्षेत्रा मध्ये असणाऱ्या रसायनीक कारखान्यातून सातत्याने रासायनीक द्रव्य मिश्रित पाणी सोडले जात आहे.तसेच रात्री प्रदूषित वायू सोडले जात असते.त्यामुळे नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होऊन नागरीकांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. एकीकडे कोरोना महामारी सुरु असल्याने हा आजार थेट रुग्णांच्या फुफ्फुसावर मारा करत आहे.तर आता ओमायक्रोन या नवीन कोरोनाच्या प्रकाराने कहर केला आहे. अशापरिस्तिथीत एमआयडीसीतील कारखानादारांकडुन थंडीमुळे पडणाऱ्या धुक्याचा गैर फायदा घेत रात्रीच्या वेळी मोठया प्रमाणात प्रदूषित वायू सोडण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. आहे.सोमवार दिनांक १० जानेवारी रोजी साडेअकरा वाजन्याच्या कोपरी गाव,बोनकोडे, सेक्टर २६ या परीसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषित वायू सोडल्याने परिसरात दुर्घधी येत होती त्यामुळे नागरीकांना मळमळ वाटणे व श्वास घेण्यास अडचणी येत होत्या.याभागात वाढणाऱ्या वायू प्रदूषणा बाबत वारंवार तक्रारी तसेच लोकप्रतीनिधींमार्फत विधानभवना पर्यत आवाज उठवून देखील प्रदूषण मंडळ ढिम्म बसलेले आहे.त्यामुळे वारंवार प्रदूषित वायू सोडणाऱ्या रसायन कारखान्यानंकडे दूर्लक्ष करुन प्रदूषण मंडळ नवी मुंबई शहराचे भोपळ शहर होण्याची वाट पाहत आहे का?असा सवाल नागरिक करीत आहेत.याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील यांच्या सोबत संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.