१३ जानेवारीला 'भूमिपुत्र परिषद' तर २४ जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन

 
पनवेल: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी दिबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून १३ जानेवारीला रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर या जिल्ह्यातील समस्त भूमिपुत्रांची 'भूमिपुत्र परिषद' तर २४ जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने शनिवार, दि. ०८ जानेवारी राेजी पनवेल येथे आगरी समाज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पुन्हा एकदा एल्गार करण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले असून जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यत लढाई सुरूच राहणार असल्याची गर्जना करण्यात आली. 
 
        लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेस समितीचे कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, सरचिटणीस भूषण पाटील, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, सहचिटणीस गुलाब वझे, संतोष केणे, राजेश गायकर, दीपक म्हात्रे, खजिनदार जे. डी. तांडेल, सदस्य नंदराज मुंगाजी, रुपेश धुमाळ, दशरथ भगत, दीपक पाटील, विनोद म्हात्रे, विजय गायकर, जयेश आक्रे, भुवनेश्वर धनु, जितेंद्र म्हात्रे, गजानन मांगरूळकर, सुनील पाटील, डी. बी. पाटील, यांच्यासह नवी मुंबई, पनवेल, उरण, मुंबई, ठाणे, कल्याण आदी विभागातील प्रकल्पग्रस्त समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 
Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून आंदोलन