नवी मुंबई पोलिसांनी विविध कारवायात जप्त केलेले तब्बल 10 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ केले नष्ट

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱयाविरोधात धडक कारवाई करुन मागील दोन वर्षात जप्त केलेले तब्बल 10 कोटी रुपये किंमतीच्या  अंमली पदार्थाची बुधवारी तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमीटेड या कंपनीमध्ये शास्रोक्त पद्धतीने नष्ट करुन त्याची विल्हेवाट लावली. नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थामध्ये 140 किलो वजनाचे एमडी, हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस, अफीम व एलएसडी पेपर यासारख्या घातक अमली पदार्थासह 500 किलो गुटख्याचा समावेश आहे. यावेळी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुर, पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  

नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने आणि विविध पोलीस स्टेशनने गेल्या दोन वर्षात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवगळ्या कारवाया करुन मोठया प्रमाणात अंमली पदार्थ पकडले होते. एमडी, हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस, अफीम व एलएसडी पेपर यासारख्या घातक अमली पदार्थाचा तसेच गुटख्याचा यात समावेश होता. नशा मुक्त नवी मुंबई अभियान कार्यक्रमाचाच एक भाग म्हणुन बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकुण 40 गुन्हयातील जफ्त करण्यात आलेले 10 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ राज्याचे वनमंत्री गणेश नाईक तसेच आमदार प्रशांत ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत नष्ट करण्यात आला.  

तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमीटेड या कंपनीतील घातक कचरा प्रक्रिया साठवण आणि विल्हेवाट सुविधा केंद्रात 140 किलो वजनाचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ तसेच 500 किलो गुटख्याचा साठा शास्रोक्त पद्धतीने नष्ट करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. नष्ट करण्यात आलेल्या या सर्व अमली पदार्थाची किंमत सुमारे 10 कोटी रुपये इतकी आहे.

नवी मुंबई पोलिसांची अमली पदार्थ तस्काराविरोधात धडक कारवाई  

नवी मुंबई पोलिसांनी सन 2023 व 2024 मध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर तसेच त्याचे सेवन करणाऱयांविरोधात धडक कारवाई करुन केली. तसेच त्यांच्यावर 1143 गुन्हे दाखल करुन 1743 आरोपींना अटक केली आहे. तसेच त्याच्याकडुन एकुण 53 कोटी रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी 111 आफ्रिकन नागरीकांना देखील अटक केली असुन त्यांच्याकडुन तब्बल 38 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जफ्त करण्यात आले आहे. त्याशिवाय पोलिसांनी सन 2023 व सन 2024 मध्ये नवी मुंबई मध्ये अवैधरित्या राहत असलेल्या 1131 आफ्रिकन नागरीक व 224 बांग्लादेशी नागरीकांवर देखील कारवाई केली आहे. तसेच यातील 1128 आफ्रिकन नागरीकांना भारत देशातुन हददपार करून परत पाठविले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

काखेत कळसा आणि गावाला वळसा!