कोपरखैरणे मधील खो-खो खेळाडू वैष्णवी जाधव हिची महाराष्ट्र संघात निवड


रा. फ. नाईक शाळेला बक्षीस मिळवून देण्यात मोलाचा वाटा

खारघर : ठाणे जिल्ह्यातून खो-खो स्पर्धा खेळणाऱ्या कोपरखैरणे मधील वैष्णवी जाधव (वय-१३) हिने नागपूर, नाशिक, पालघर, ठाणे, रत्नागिरी आदी ठिकाणी संपन्न झालेली राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा गाजविली असून, तिची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. त्यामुळे वैष्णवी जाधव हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

भारत देशात इतर खेळांबरोबर देशातील सर्वात लोकप्रिय पारंपरिक खेळांपैकी खो-खो खेळाची स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित केली जाते. या खेळात मैदानाच्या दोन्ही बाजूला दोन खांब असल्याने पाठलाग करणारा आणि बचाव करणारा या दोन्हीमध्ये तंदुरुस्ती, कौशल्य, वेग आणि उर्जा यांची कसब लागते. ‘श्रमिक शिक्षण मंडळ' संचालित कोपरखैरणे सेवटर-८ मधील रा. फ. नाईक शाळेत सातवीत शिक्षण घेणाऱ्या वैष्णवी कृशांत जाधव हिने ठाणे जिल्ह्यातून चौदा वर्षाखालील गटातून खो-खो खेळताना  नागपूर, नाशिक, पालघर, ठाणे आणि रत्नागिरी आदी ठिकाणी पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करुन स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे. वैष्णवी जाधव हिच्या कामगिरीची दखल घेवून नुकतीच तिची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.  वैष्णवी जाधव चौथी मध्ये असताना शाळेतील क्रीडा शिक्षकानी तिच्यातील कौशल्य पाहून तिच्यामध्ये खो-खो खेळाची आवड निर्माण केली. वैष्णवी जाधव हिने नागपूर, नाशिक, पालघर, ठाणे आणि रत्नागिरी आदी ठिकाणी पार पडलेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करत उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट अटॅक्ट, उत्कृष्ट बचावात्मक खेळाडू म्हणून बक्षिस मिळविले आहे. तसेच  जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत तिने रा. फ. नाईक शाळेला बक्षीस मिळवून दिले आहे. वैष्णवी जाधव सध्या रा. फ. नाईक शाळा मधील व्रÀीडा शिक्षक आणि ग्रिफिन जिमखाना प्रशिक्षक मयूर पालांडे यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे.

वैष्णवी जाधव हिने खो-खो खेळात नावलौकिक केला आहे. ठाणे जिल्ह्यातून चौदा वयोगटातील मुलींच्या संघात खेळत असताना नुकतीच वैष्णवी जाधव हिची महाराष्ट्र खो-खो संघात निवड झाल्यामुळे समाधान वाटत आहे. - मयूर पालांडे, शिक्षक - रा. फ. नाईक शाळा, कोपरखैरणे, नवी मुंबई.  

वैष्णवी जाधव यापुढे खो-खो खेळात नवी मुंबई शहराचा नावलौकीक करेल असा विश्वास आहे. पाल्यांच्या कलागुणांना वाव देवून पालकांनी मुले-मुलींना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. - कृशांत जाधव, वडील - कोपरखैरणे. 

 

Read Previous

राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय खो खो संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र