राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय खो खो संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र

राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या संघाचा सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका संचलित रबाले आंबेडकर नगर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या संघाने चिंचणी पालघर येथे झालेल्या विभागीय १४ वर्षाखालील खो-खो (मुले) स्पर्धेत पालघर संघावर एक डाव दोन गडी राखून विजय संपादन केला. या विजयामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या संघाने साखरवाडी सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला आहे. पालघर मधील स्पर्धेतील विजयाबद्दल राजर्षीी छत्रपती शाहू महाराज विद्यालय संघाला शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा मार्गदर्शक पांडुरंग परब, नरेंद्र कुंदर, जगदीश दवणे, विजय अष्टेकर यांच्या शुभहस्ते प्रथम क्रमांकाचा चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विजेत्या संघातील आशिष गौतम, ऋग्वेद शिंदे, करण गुप्ता, ओमकार सावंत, वीर पवार, बसवराज कंपापूर, गणेश जाधव यांनी उत्तम खेळ करुन क्रीडा रसिकांची वाहवा मिळवली. सदर स्पर्धेमध्ये राजर्षी शाहू महाराज विद्यालयाच्या संघाने बलाढ्य अशा रायगड आणि वसई या संघांना धूळ चारत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. यानंतर झालेल्या अंतिम सामन्यात या संघाने पालघर संघावर एक हाती विजय प्राप्त केला. राजर्षीी छत्रपती शाहू महाराज विद्यालय संघातील खेळाडूंुाा खोखो प्रशिक्षक प्रताप शेलार, स्वप्नील पाटील, लोकेश गवस, गजानन शेंगाल, क्रीडा शिक्षक अमोलकुमार वाघमारे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहान लाभले. सदर विजयाबद्दल शाळेच्या सर्व विजेत्या खेळाडुंचे माजी महापौर सुधाकर सोनवणे, मुख्याध्यापक रंजना वनशा, अमोल खरसंबळे, कमलेश इंगळे दिनेश भोये यांनी विशेषत्वाने अभिनंदन करीत त्यांना पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

Read Next

मयूर पालांडे यांची भारताच्या पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती