मयूर पालांडे यांची भारताच्या पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती

नवी मुंबईची रूपाली बडे हिची आशियाई खो- खो स्पर्धेसाठी निवड

नवी मुंबई :आसाम गोवाहाटी येथे 20 ते 23 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या आशियाई आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष संघाच्या प्रशिक्षक पदी ग्रिफिन जिमखान्याचे मयूर पालांडे यांची आणि भारताच्या महिला संघात रूपाली बडे हीची निवड झाली आहे. याबद्दल ग्रिफिन जिमखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार संदीप नाईक यांच्या शुभहस्ते या दोघांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एफ जी नाईक कॉलेजचे प्राचार्य प्रताप महाडिक, रा फ नाईक विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी नरेंद्र म्हात्रे, आंतरराष्ट्रीय खो-खो पटू शितल भोर हे मान्यवर उपस्थित होते.

 पालांडे आणि रूपाली यांची झालेली निवड संपूर्ण नवी मुंबईकरांसाठी अभिमानास्पद आहे. नवी मुंबई मधून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडत असल्याचा आनंद यावेळी संदीप नाईक यांनी व्यक्त केला. 

 पालांडे हे रा फ नाईक विद्यालयाचे प्रशिक्षक आहेत तसेच रूपाली ही याच विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. साधारणपणे वीस वर्षांपूर्वी आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईमधून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांना अनुषंगाने खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आमदार चषक क्रीडा स्पर्धा, नवी मुंबई क्रीडा संकुलाच्या ऑलिंपिक धरतीवरील स्पर्धा अशा स्पर्धा सुरू केल्या.  ग्रिफिन जिमखानाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण आणि जागतिक दर्जाच्या आवश्यक त्या सर्व सुविधा खो-खोपटूंना उपलब्ध करून दिल्या आहेत.

या उपक्रमांचा परिपाक म्हणून आज नवी मुंबईतून राज्यस्तरीय,  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू उदयास येत आहेत. शितल भोर, संकेत कदम आणि पूर्णिमा सकपाळ या खो-खोपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे  पूर्णिमा हिने भारतीय खो-खो संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. अडीचशे पेक्षा अधिक नवी मुंबईतील खेळाडूंनी आतापर्यंत राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवले आहेत याचा मला अभिमान आहे.

मयूर पालांडे सरांचे देखील संदीप नाईक यांनी अभिनंदन केले. आशियाई पुरुष स्पर्धेच्या प्रशिक्षकपदी ते निश्चितच चांगली कामगिरी करून भारतीय संघाला या स्पर्धेमध्ये विजयश्री प्राप्त करून देतील, अशा शुभेच्छा दिल्या.

Read Previous

राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय खो खो संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र