क्रिकेटपटूंसाठी विशेष आकर्षण असलेली धर्मवीर क्रिकेट चषक स्पर्धा उद्या पासून सुरू

नवी मुंबईत उद्यापासून रंगणार धर्मवीर चषक क्रिकेट सामने

नवी मुंबई : मुंबई महाराष्ट्रसह संपूर्ण देशातील क्रिकेटपटूंसाठी विशेष आकर्षण असलेली धर्मवीर क्रिकेट चषक स्पर्धा उद्या 23 डिसेंबर पासून नवी मुंबईत सुरू होत आहे. स्पर्धेतील सामने कोपरखैरणे येथील भूमिपुत्र मैदानावर खेळले जाणार आहेत. स्पर्धा 25 डिसेंबर पर्यंत चालणार असून स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

शिवसेना शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे यांच्या माध्यमातून गेल्या २० वर्षांपासून कोपरखैरणे येथील भूमिपुत्र मैदानावर धर्मवीर क्रिकेट चषकाचे आयोजन केले जात आहे. स्पर्धेचे यंदा 21वे वर्ष आहे. यंदा खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेमध्ये १६ संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी आठ संघ हे नवी मुंबईतील स्थानिक असून अन्य आठ संघ हे देशभरातील आहेत. या संघांमध्ये देशभरातील तसेच आखाती राष्ट्रांमधील नामांकित खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या संघाला दोन लाख २२ हजाराचे तर द्वितीय येणाऱ्या संघाला एक लाख 11 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धा तीन दिवस चालणार आहे. 25 डिसेंबर रोजी होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभाला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि खासदार राजन विचारे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक आणि शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, संपर्कप्रमुख विद्याधर चव्हाण, उपजिल्हा संघटक वैशाली घोरपडे, मधुकर राऊत, राजू आव्हाड, संदीप पवार, विजय पाटील, शुभांगी रावखंडे आदी उपस्थित होते.

सात शाखांचे उद्घाटन...
शिवसेनेच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये प्रभाग तिथे शाखा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार कोपरखैरणे परिसरामध्ये पाच आणि घनसोली विभागांमध्ये दोन शाखा सुरू करण्यात येत आहेत. या सातही शाखांचे उद्घाटन 25 डिसेंबर रोजी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती यावेळी जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी दिली.

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार

Read Next

‘सानपाडा प्रिमियर लीग'चा विजेता अशोक स्मृती संघ; विधीशा चॅलेंजर उपविजेते