कांदा बटाटा लिलाव गृहाची कमान कोसळली

धोकादायक झालेल्या कांदा बटाटा लिलाव गृहाचा प्रश्न ऐरणीवर

नवी मुंबई -; वाशी कृषी उत्पन्न.बाजार आवारातील कांदा बटाटा मार्केट मधील लिलाव ग्रहाच्या छताची कमान कोसळण्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. सुदैवाने सदर कमान वाहनावर कोसळल्याने यात कुणीही जखमी झाले नाही. मात्र सदर घटनेने  धोकादायक झालेल्या कांदा बटाटा लिलाव गृहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वाशीतील कृषी उत्पन्न समितीच्या कांदा बटाटा  आवारात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तसेच व्यापाऱ्यांसाठी लिलाव गृहाची उभारणी केली आहे. आणि या लिलाव गृहात रोज मोठी उलाढाल होत आहे. मंगळवारी सकाळी या ठिकाणी वाहने खाली होत असताना अचानक पूर्व दिशेच्या पत्र्याची एक  लोखंडी कमान खाली कोसळली. या पत्र्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी  जी नाली बनवली होती त्याची ही कमान होती. मात्र कमान ज्या वेळी  कोसळली त्यावेळी या ठिकाणीं वाहनांतून कामगार शेतमाल खाली करत होते. मात्र सदर कमान वाहनांवर पडल्याने पुढील अनर्थ टळला असून यात कोणीही जखमी झाली नसल्याची माहिती  एपीएमसी प्रशासनाने दिली आहे. तर कमान कोसळलेला भाग सध्या सील केला असून सदर लिलाव गृहाचे तज्ञांकडून संरचनात्मक परीक्षण केले जाईल आणि त्यांच्या अहवालनंतर या लिलाव गृहाच्या बाबतीत पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहिती कांदा बटाटा बाजार समितीचे अभियंता मेहबूब व्यापारी यांनी दिली.

Read Previous

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

Read Next

मराठी उद्योजक मेळावा संपन्न