मराठी उद्योजक मेळावा संपन्न

मराठी माणसांनी उद्योजक होण्याची मानसिकता ठेवली पाहिजे -  केंद्रीय मंत्री नारायण राणे

नवी मुंबई -:महाराष्ट्रातील मराठी माणसांनी उद्योजक होण्याची मानसिकता ठेवली पाहिजे आणि त्यासाठी रीतसर प्रशिक्षण घेऊन  केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम  खात्याकडे आल्यास त्यांची प्राधान्याने कामे केली जातील असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठी उद्योजकांना दिले. सॅटर्डे क्लबच्या वतीने वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात मराठी उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राणे यांनी आपले मत व्यक्त केले.

सूक्ष्म,लघु आणि मध्यम  मंत्रालयाचा कारभार संभाळून आज एक वर्ष उलटला.जेव्हा सॅटर्डे क्लबचे सदस्य मला भेटण्यास आले तेव्हा मी एक मराठी उद्योजकाच्या प्रतीक्षेत होतो. मात्र आज प्रत्यक्षात यांनी हजारो मराठी उद्योजक तयार केल्याचे पाहून अतिशय आनंद झाला आहे. त्यामुळे सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून सुरू केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून आज उपयुक्त आहे.अशी शाबासकीची थाप यावेळी राणे यांनी आयोजकांना दिली.

तर राजकीय जीवनात आज ३३ वर्ष काम करत असताना कुणा मराठी माणसाचे काम आले तर ते केले पाहिजे अशीच भावना ठेवत आलो आहे.

त्यामुळे मराठी माणसाने मराठी माणसाची आपुलकीने वागले  पाहिजे, काही अडचणी असतील प्रश्न केले पाहिजे आणि एकमेकांना सहाय्य करून पुढे नेले तर असे कार्यक्रम भरवण्याची गरजच लागणार नाही असे मत ही राणे यांनी व्यक्त केले.यावेळी क्लबच्या माध्यमातून मराठी उद्योजकांच्या मागणीचे एक निवेदन राणे यांना देऊन दिल्लीत भेटण्याची वेळ मागण्यात आली.  यावेळी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आणि संचालक अशोकराव दुगाडे, उद्योजक सतीश हावरे, मनोज पाटील, संतोष पाटील, रामदास माने, अतुल अत्रे, श्रीकृष्ण पाटील यादी पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते.

Read Previous

१३ ते १६मे दरम्यान वाशीत होणार क्रेडाई-बीएएनएम यांच्या २०व्या मेघा प्रॉपटी प्रदर्शन

Read Next

 १ ऑगस्टपासून मच्छीमार बोटी पुन्हा समुद्रात