वाशीत  मंगळवारी भरणार उद्योजकता सोहळा 

१२ जुलैस उद्योजकता सोहळा

नवी मुंबई -: महाराष्ट्रातील मराठी उद्योजकांनी एकत्र यावे आणि एकमेकांना मदत करून व्यवसाय वृद्धी करावी.यासाठी स्याटर्डे कल्ब संस्था काम करत आहे आणि या संस्थेचा १२ जुलै हा स्थापना दिवस  मराठी उद्योजकता दिवस म्हणून  साजरा केला जाणार आहे. केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात मंगळवारी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. अशी माहिती संस्थेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

श्रीमंत होण्यासाठी मराठी माणसाने नोकरी सोडून धंदा करणे, मराठी माणसाने एकत्र येऊन परस्परांना धंदा देणे , थोड्या यशात संतुष्ट न राहणे आणि मोठे स्वप्न पाहणे , मुख्य म्हणजे स्वतःची मानसिकता बदलून श्रीमंतीच्या वाटेवर मार्गस्थ होणे हा  सॅटर्डे क्लबचा उद्देश आहे आणि हा उद्देश हळूहळू सफल होतांना दिसत आहे .

संस्थेशी संपुर्ण महाराष्ट्रात दहा हजार पेक्ष्या जास्त उद्योजक जोडले गेले आहेत आणि करोडोंचा व्यवसाय परस्परांमध्ये करत आहेत . पुढील २ वर्षांत मराठी उद्योजकांचे जाळे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण भारतात पसरवून पन्नास हजार ते एक लाख मराठी उद्योजकांना सॅटर्डे क्लब संस्थेशी जोडण्याचा मानस आहे .त्यामुळे मराठी उद्योजकांसाठी मौलिक कार्य करणाऱ्या सॅटर्डे क्लब संस्थेचा १२ जुलै हा स्थापना दिवस जो ह्या वर्षी मराठी उद्योजकता दिवस म्हणून वाशीत साजरा केला जाणार आहे . मराठी उद्योजकांना श्रीमंतीचा मार्ग दाखवणाऱ्या आणि त्यांना व्यवसायात प्रगतीशील करण्यासाठी सातत्यपूर्ण काम  सॅटर्डे क्लबने केले आहे.त्यामुळे संस्थने उभारलेल्या या चळवळीत प्रत्येक मराठी उद्योजकाने सहभागी व्हावे  असे आवाहन यावेळी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आणि संचालक  अशोकराव दुगाडे यांनी केले.यावेळी  यावेळी संतोष पाटील,अतुल अत्रे,श्रीकृष्ण पाटील यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

Read Next

कांदा बटाटा लिलाव गृहाची कमान कोसळली