वाशी पादचारी पूल रद्द न केल्यास आंदोलन - नवी मुंबई कोंग्रेस चे प्रवक्ता वैभव सावंत

नवी मुंबई-: वाशी कोपरखैरणे रस्त्यावर सेक्टर ९ व १५/१६ या ठिकाणी पादचारी पुल बांधण्याचे काम मनपाकडुन सुरू आहे. मात्र यास आधी भाजप ने विरोध केल्यानंतर काँग्रेस ने देखील उडी घेत सदर पादचारी पूल रद्द न केल्यास उपोषणासह आंदोलन करण्याचा इशारा नवी मुंबई कोंग्रेस चे प्रवक्ता वैभव सावंत यांनी दिला आहे.

वाशी - कोपरखैरणे रस्त्यावर सेक्टर ९ आणि १५/१६ येथे नागरिक  रस्ता  ओलांडताना मोठी वाहतूक कोंडी होत असते. आणि ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडुन २ कोटी ४४ लाख रु खर्च करून पादचारी पूल बांधण्याचे काम हाथी घेण्यात आले आहे.मात्र सदर पुलाचा वापर करताना जेष्ठ नागरीक व महिला वर्गाला मोठी अडचण येणार असल्याने सदर पादचारी पूल रद्द करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.याआधी भाजप चे विकास सोरटे यांनी मागणी केली होती. तर आता यात वादात काँग्रेस ने उडी घेतली असून सदर पादचारी पूल रद्द करुन या ठिकाणी भुयारी मार्ग बनवावा जेणे करून जेष्ठ नागरीकांची गैरसोय होणार नाही.त्यामुळे सदर पादचारी पूल रद्द करावा म्हणून या ठिकाणी २६ जानेवारी पर्यंत सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे.व २६ जानेवारीलाच उपोषण करत आंदोलन करणार असल्याचा इशारा नवी मुंबई काँग्रेस चे प्रवक्ता वैभव सावंत यांनी दिला आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा - पनवेल भाजपची मागणी