सिडकोच्या कार्यक्रमात राजशिष्टाचाराचे उल्लंघन ?
नवी मुंबई-:सिडको मार्फत सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहीती देण्यासाठी नेरुळ जेट्टी येथे सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मात्र या कार्यक्रमात राजशिष्टाचाराचे उल्लंगन करत राजकीय कार्यकर्त्यांनी आसन व्यवस्था बळकावळी होती.त्यामुळे सदर कार्यक्रन शासकीय होता की राजकीय होता असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला होता.
सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे नवी मुंबईत आले होते. यावेळी नेरुळ जेट्टी येथे सिडको कडून सुरू असलेल्या व भविष्यात राबवत असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण ठेवण्यात आले होते.मात्र सदर कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम असून देखील प्रकल्प सादरीकरणावेळी नवी मुंबईतील व पनवेल मधील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजशिष्टाचाराचे उल्लंघन करत आसन व्यवस्था हायजॅक करत आपला चमकिश पणा दाखवून दिला.सदर कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन हे सिडको मार्फत करण्यात आले होते. मात्र यावेळी बहुतांश कार्यकर्त्याकडे कुठलेही शासकीय आणि संविधानिक पद नसताना देखील प्रकल्पांच्या सादरीकरणं वेळी शासकीय अधिकाऱ्यांच्या दिमतिला खुर्ची खेटून बसले होते.त्यामुळे सदर कार्यक्रम हा सिडकोचा (शासकीय)होता का ? महावीकास आघाडीचा होता असा प्रश्न या निमित्ताने उअस्थित होत आहे.तर सदर कार्यक्रम सुरू असताना एक उच्चपदस्थ पोलीस अधिकारी त्याठिकाणी आले असता त्यांना आसन खाली नसल्याने त्यांनी उभ्यानेच सर्व कार्यक्रम पाहिला.तर सदर शासकीय कार्यक्रम हा सिडकोच्या माध्यमातून अयोजिला असल्याने शासकीय अधिकारी वर्गासोबत कोण बसले पाहिजे कोण बसले नाही पाहिजे याचे नियोजन सिडको जनसंपर्क विभागाने करायला हवे होते. मात्र याचे भान सिडको जनसंपर्क विभागाला नसल्याने त्यांचा जनसंपर्क किती दांडगा आहे हे यावरुन स्पष्ट होत आहे.