जुईनगर ते श्री क्षेत्र एकवीरा गड कार्ला पदयात्रा, पालखी मार्गस्थ 

नवी मुंबई-: जुईनगर ते श्री क्षेत्र एकवीरा कार्ला पदयात्रा रविवार २ जानेवारी ते बुधवार ५ जानेवारी २०२२दरम्यान काढण्यात आली  असून रविवार २ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता आरती केल्या नंतर पालखी जुईनगर गावदेवी मंदिराला प्रदिक्षणा झाल्या नंतर पालखी श्री एकविरा गड कार्ला लोणावळा येथे मार्गस्थ झाली. जुईनगरमधील गावदेवी युवा मित्र मंडळाच्या वतीने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून यंदा पदयात्रेचे दहावे वर्ष आहे.

या पदयात्रेमध्ये नवी मुंबई, ठाणे, पनवेल, उरण तसेच मुंबईतील तरुण, भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडकोच्या कार्यक्रमात राजशिष्टाचाराचे उल्लंघन ?