बेलपाडा ते तळोजा फेज दोन एनएमएमटी बस सेवा सुरू 

खारघर: नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाने नवीन वर्षांत खारघर रेल्वे स्थानक- बेलपाडा, उत्सव चौक मार्गे तळोजा फेज दोन या मार्गावर 45 क्रमांकाची नवीन बससेवा सुरू केल्याने प्रवासी वर्ग समाधान व्यक्त करीत आहे.

   दिवा पनवेल रेल्वे मार्गावरील तळोजा वसाहतीलगत असलेला भुयारी मार्ग सुरू झाल्यानंतर लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. तसेच नवीन वर्षात मेट्रो सेवा सुरू होणार असून सिडकोच्या गृहनिर्माण सोसायटीत नव्याने येणाऱ्या नागरिकांची भर पडणार आहे. तळोजा फेज एक आणि दोन मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्य करीत आहे. तळोजा वसाहतीत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेची बस क्रमांक 54 खारघर रेल्वे स्थानक ते शीघ्र कृती दल तर बस क्रमांक 52  आणि 55 या दोन बसेस खारघर वसाहती मार्गे तळोजा वसाहत मार्गावर धावते. तसेच नव्याने विकसीत होत असलेल्या तळोजा वसाहतीत कामावर येणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. एनएमएमटीची बससेवा खारघर रेल्वे स्थानक बेलपाडा, रेल विहार,उत्सव चौक, रेजन्सी, सेंट्रल पार्क मार्गे तळोजा फेज दोन मार्ग बस सेवा सुरू केल्यास प्रवासांचा वेळ वाचेल आणि वेळेवर कामावर जाता येईल, यासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेने बेलपाडा ते तळोजा फेज दोन मार्गावर बस सुरू करण्यात यावे असे पत्र पनवेल शहर काँग्रेस पक्ष उद्योग आणि वाणिज्य विभागाचे अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर याना दिले होते. तसेच नोव्हेंबर महिन्यात आयुक्तांची भेट घेवून बस सुरू करण्याची मागणी केली होती. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाने एक जानेवारी पासून खारघर रेल्वे स्थानक बेलपाडा,उत्सव चौक मार्गे तळोजा फेज दोन या मार्गावर 45 क्रमांकाची नवीन बससेवा सुरू केल्याने प्रवासी वर्ग समाधान व्यक्त करीत आहे.ही बस बेलपाडा, रेल विहार,उत्सव चौक, रेजन्सी, सेंटमेरी शाळा, इस्कॉन मंदिर, सेंट्रल पार्क, टाटा हॉस्पिटल, ओवेगाव सीआयएसएफ, सेक्टर पस्तीस, सत्य साई हॉस्पिटल, पापडीचा पाडा, शीघ्र कृती दल तळोजा फेज एक मधील रॉयल रेसिडेन्सी, मिडलँड सोसायटी आणि तळोजा फेज दोन पेंधर मेट्रो स्थानक या मार्गावर धावणार आहे.तळोजा फेज दोन वरून सकाळी सहा वाजता ते खारघर रेल्वे स्थानकावरून सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी तर रात्री आठ वीस वाजता शेवटची बस असणार आहे. दर तेरा ते चौदा मिनिटांनी बस सेवा उपलब्ध होणार असल्यामुळे प्रवासी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बेलापूर येथे आमदार निधीतून उभारणार समाजमंदिर - आ.मंदा म्हात्रे