तुर्भे स्टोअर येथे ई श्रम कार्ड नोंदणी शिबीर संपन्न
नवी मुंबई : शिवसेना उपनेते विजय नाहटा आणि ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली २ जानेवारी रोजी तुर्भे स्टोअर येथील शिवसेना शाखा क्रमाक-१ मध्ये नाका कामगार, फेरीवाले, रिक्षाचालक, घरकामगार यांच्यासाठी 'नवी मुंबई शहर फेरीवाला असोसिएशन'चे अध्यक्ष बाळकृष्ण खोपडे याचा नेतृत्वाखाली ई श्रम कार्ड शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात फेरीवाल्यांसाठी नवी मुंबई महापालिका तर्फे असलेली वीस हजार रुपये विना जामीन कर्ज योजना आणि विधवांना आर्थिक मदत योजना या विषयी देण्यासाठी युवा संस्था तर्फे मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचा 200 पेक्षा अधिक असंघटित वर्गातील श्रमिकानी फायदा घेतला. यावेळी युनियनचे उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, सचिव शाताताई जाधव, युनियन सदस्य बसु पात्रवट, शिवसेना शाखाप्रमुख भरत कांबळे, प्रविण पाटील, शिवसैनिक बाळु भालेराव आणि मोठ्या संख्येने स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.