नेरुळ मध्ये राष्ट्रवादीतर्फे स्वच्छता अभियान 

नवी मुंबई :- नेरूळ सेक्टर सहा परिसरातील तानाजी मालुसरे क्रिडांगण व राजमाता जिजाऊ उद्यानात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नेरुळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेले स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले.

तानाजी मालुसरे क्रिडांगणात वाढलेले जंगली गवत, रॅबिट, डेब्रिज, मातीचे ढिगारे यामुळे परिसराला बकालपणा आला होता. उद्यान व क्रिडांगणात रपेट मारायला येणाऱ्या रहीवाशांमध्येही बकालपणाविषयी उघडपणे नाराजी व संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे उद्यान व क्रिडांगणात स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेताला, त्याबाबत त्यांनी महापालिका नेरूळ विभाग अधिकारी व महापालिका आयुक्तांना लेखी निवेदनातून स्वच्छता अभियानाविषयी कल्पना दिली.

रविवारी,  २  जानेवारी रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत सफाई अभियान राबविण्यात आले. प्रभागातील आठ वर्षाच्या मुलापासून ७९ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकापर्यत अनेक जण या अभियानात सहभागी झाले होते. प्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी, महिला यांच्यासह प्रभाग ८५ चे राष्ट्रवादीचे अध्यक्ष यशवंत मोहिते, प्रभाग ८६चे अध्यक्ष प्रमोद शेळके, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत सोळस्कर, प्रभाग ८५ चे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष निखिल हांडे,  रवींद्र सुर्वे, वसंत सावंत, भिमराव चांगुने,  सुषमा पवार, सविता यादव, सुजाता  घारे, मनपा कर्मचारी तांडेल, बापू यादव यांच्यासह विभागातील अनेक जण सहभागी झाले होते. या स्वच्छता अभियानात मैदानातील कचरा उचलण्यात आले. जंगली गवत काढण्यात आले. डेब्रिज व मातीचे ढिगारे हटविण्यात आले. क्रिडांगणाला आलेला बकालपणा स्वच्छता अभियानामुळे कमी झाला असल्याने स्थानिक रहीवाशांकडून महादेव पवार यांना धन्यवाद देण्यात आले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तुर्भे स्टोअर येथे ई श्रम कार्ड नोंदणी शिबीर संपन्न