नवी मुंबईत शौचालय चालकांकडून नागरिकांची लूट ?
नवी मुंबई -: नवी मुंबई महानगरपालकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हागणदारीमुक्त शहराची संकल्पना रराबवत असताना उघड्यावर शौचालय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. तर दुसरी कडे नैसर्गिकविधी उरकण्या साठी शौचालयात गेले असता त्याठिकाणी शौचालय चालक निर्धारित दरांपेक्षा।अतिरिक्त दर आकारून सर्वसामान्य नागरिकांची लूट करीत आहेत. त्यामुळे अशा शौचालय चालकांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
हागणदारीमुक्त शहर बनवण्याहेतू नवी मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात शौचालयांची निर्मिती केली आहे.आणि यातील बहुतांश शौचालय खाजगी संस्थाना चालविण्यास दिले आहेत.मात्र या शौचालयात नैसर्गिक विधी साठी गेलेल्या नागरिकांकडून किती दर घ्यायाचे याचे नियम देखील निर्गमित केले आहेत.परंतु या नियमांना हरताळ फासत महत्वाच्या ठिकाणी असणाऱ्या शौचालय धारक दुप्पट पेक्षा जास्त दर आकारत असल्याचे समोर आले आहे.महानगर पालिकेच्या नियमानुसार सार्वजनिक शौचालयत नैसर्गिकविधी साठी जाणाऱ्या नागरिकांकडून दोन रुपये मूल्य आकारणे गरजेचे आहे.परंतु वाशी परिसरात काही शौचालयात निर्धारीत दरांपेक्षा अतिरिक्त दर आकारले जात आहेत. आणि याबाबाबत विभागस्तरावर तक्रार करुन देखील ठोस कारवाई केली जात नसल्याने अतिरिक्त दर आकारणीचे सत्र सुरूच आहे