लघुपटातून स्वच्छता संकल्पना जाणून घेण्याचा प्रयत्न कौतुकास्पद - अभिनेते विजय निकम

      नवी मुंबई : 'स्वच्छ सर्वेक्षण 2021' मध्ये देशातील मोठ्या शहरात प्रथम येण्याचा बहुमान संपादन केल्यानंतर हे श्रेय नागरिकांचे असल्याचे सांगत पुढच्या 2022 वर्षासाठीच्या स्वच्छ सर्वेक्षणाला सामोरे जाताना स्वच्छतेविषयी नागरिकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न नवी मुंबई महानगरपालिका करीत आहे हीच प्रशंसा करण्यासारखी गोष्ट असल्याचे मत चित्रपट, मालिका, वेबसिरीज मधील लोकप्रिय कलावंत श्री. विजय निकम यांनी व्यक्त केले.

      'स्वच्छ सर्वेक्षण 2022' च्या अनुषंगाने 'नागरिकांना प्राधान्य (People First)' हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून लोकसहभाग वाढीच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित 'लघुपट स्पर्धा (Short Film Compitation)' अंतिम फेरीच्या परीक्षणप्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त केले.

      'स्वच्छ सर्वेक्षण 2022 लघुपट स्पर्धा (Short Film Compitation)' यामध्ये 33 संस्था, समुहांचे लघुपट प्राप्त झाले असून पहिल्या फेरीतून निवडलेल्या अंतिम फेरीसाठीच्या 11 लघुपटांचे सादरीकरण लघुपट निर्माते, दिग्दर्शक यांच्या उपस्थितीत मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झाले. अंतिम फेरीचे परीक्षण सुप्रसिध्द अभिनेते श्री. विजय निकम आणि दृष्यम् चित्रपट तसेच लक्ष्य मालिकेतील नामवंत अभिनेते कमलेश सावंत यांनी केले.

      बाहेरच्या शहरातून नवी मुंबईत प्रवेश केल्यापासूनच हे वेगळे शहर असल्याचे नजरेला जाणवते असे मत व्यक्त करीत लघुपटासारख्या उपक्रमांमधून स्वच्छता कार्याला अधिक गती मिळेल व लघुपटांच्या माध्यमातून जनजागृती होईल असा विश्वास नामांकित अभिनेते कमलेश सावंत यांनी व्यक्त केला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई