खारघर: खारघर परिसरात विना मास्क तसेच हॉटेल मध्ये गर्दी करणाऱ्या हॉटेल चालकांवर पालिकेने दंडात्मक कारवाई करून तीन दिवसात एक लाख ऐंशी हजार रुपये दंड वसूल केला आहे. तसेच गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे हिरानंदानी परिसर बंद ठेवण्यात आले होते.
पनवेल पालिका हद्दीत कोवीड संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी प्रत्येकाने कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिले होते. त्यात खारघर मध्ये चार ओमायक्रोनचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी विनामास्क घराबाहेर पडू नये तसेच दिथर्टी फस्टच्या दिवशी नागरिकांनी आणि हॉटेल मालकाने गर्दी होणार नाही. याची दक्षता घ्यावे असे आवाहन करण्यात आले होते. मात्र काही नागरिक विना मास्क आढळून आल्याने तसेच काही हॉटेल मध्ये झालेली गर्दी आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे पालिका अधिकाऱ्याचा निदर्शनास येताच पालिकेने दंडात्मक करून करून तीन दिवसात एक लाख ऐंशी हजार दोनशे रुपये दंड वसूल केला आहे.