उद्यान विभागाच्या उदासीनत्यामुळे  कंपोस्ट पीट  प्रकल्प बारगळला?

नवी मुंबई--: उद्यानाचे शहर म्हणून  आज नवी मुंबई  शहराची ओळख झालीआहे.स्वच्छता सर्वेक्षण सुरु झाल्यानंतर  नवी मुंबई शहराला एक नवे रूप देण्याचा  प्रयत्न पालिकेने केला . या दरम्यान शहराचे सुशोभिकरण करण्यासाठी अगदी जागा मिळेल तिथे झाडे लावून परिसर सुशोभित करून उद्यानांची निगा राखली जात होती. उद्यानातून निघणाऱ्या झाडांचा पाळा पाचोळा हि वाया जावू नये त्यापासून कम्पोस्ट खत बनवले जावे या साठी प्रत्येक उद्यानात महापालिकेने हे काम्पोस्ट पीट बनवल्या होत्या.मात्र  कंपोस्ट पीट  हाताळणी कडे उद्यान विभागाचे पूरते  दुर्लक्ष झाले असून या कंपोस्ट पीट चे रूपांतर सध्या कचरा कुंडयात झाले आहे.त्यामुळे महापालिकेचा खत प्रकल्प पूर्णपणे बारगळला आहे.

नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर उद्याने आहेत.आणि या उद्यानातील झाडांना मिळावे म्हणून याच उद्यानात पडणाऱ्या पाला पाचोळ्या पासून खत निर्मिती करून त्याचा वापर त्याच उद्यानातील झाडांसाठी करता यावा  म्हणून तत्कालीन मनपा आयुक्त डॉ.रामस्वामी एन यांच्या संकल्पेनेतून  कंपोस्ट पीट प्रकल्प सुरू करण्यात आला.शहरातील प्रत्येक उद्यानात अशा कंपोस्ट बनवण्यात आल्या .तसेच शहारातील सोसायट्यांना देखील सोसायटी आवारात कंपोस्ट किट बसवण्याचे आवाहन करण्यात आले होते.त्याला प्रतिसाद देत  सोसायट्यांनी देखील कंपोस्ट किट बसवल्या.मात्र बऱ्याच सोसायटी मधील कंपोस्ट पीट आजही कार्यरत आहे.मात्र महापालिका उद्यानातील कंपोस्ट पीट योग्यरित्या हाताळत नसल्याने आजमितिला त्या कचऱ्या कुंड्या बनत चालल्या आहेत.बऱ्याच पीट मध्ये कचरा टाकला जात आहे.आणि याकडे उद्यान विभागाचे सपशेल दुर्लक्ष होत चालले आहे.एकीकडे स्वच्छ सर्वेक्षण मध्ये पहिला क्रमांक यावा म्हणून महापालीने कंबर कसली आहे तर दुसरी कडे महापिलिकेच्याच प्रकल्पाला खीळ बसत चालली  आहे.त्यामुळे खत बनविण्याचा कंपोस्ट पीट प्रकल्प पूर्ण पणे बारगळला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लघुपटातून स्वच्छता संकल्पना जाणून घेण्याचा प्रयत्न कौतुकास्पद - अभिनेते विजय निकम