डीपीएस तलावाला ‘फ्लेमिंगो' संवर्धन दर्जा
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ तर्फे नवी मुंबई शहरातील नेरुळ येथील ३० एकर क्षेत्रतील डीपीएस तलावाला फ्लेमिंगो संवर्धन राखीव दर्जा म्हणून घोषित करण्याच्या अधिकृत शिफारशीला मान्यता देण्यात आली आहे..
ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या उपग्रह पाणथळ परिसंस्थेचा भाग असलेला डीपीएस तलाव पहिला पाणथळ प्रदेश आहे, जो संवर्धन मालमत्ता म्हणून संरक्षित केला गेला आहे. टीसीएफएस मधील गुलाबी पक्षी या पाणथळ प्रदेशात उडतात.
मुंबई मधील मंत्रालय मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ तर्फे १७ एप्रिल रोजी आयोजित २४ व्या बैठकीत महाराष्ट्र वन विभागाकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार नेरुळ येथील डीपीएस फ्लेमिंगो तलावाला पलेमिंगा संवर्धन राखीव दर्जा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. नेरुळ येथील डीपीएस तलाव फ्लेमिंगो संवर्धन राखीव म्हणून घोषित झाल्यामुळे या क्षेत्रात बांधकाम करण्यास कायमस्वरुपी मज्जाव असणार आहे. मंत्रालयात झालेल्या मंडळाच्या बैठकीत राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांनीही डीपीएस तलाव पलेमिंगो संवर्धन राखीव क्षेत्रात बांधकाम करण्यास कायमस्वरुपी मज्जाव करण्याच्या प्रस्तावाला आणखी मार्गस्थ केल्याने या प्रस्तावाला देण्यात आली आहे.
नेरुळ येथील डीपीएस तलाव फ्लेमिंगोंसाठी एक महत्त्वाचा गंतव्यस्थान असल्याने नवी मुंबई शहराच्या जैवविविधतेच्या हितासाठी संवेदनशील क्षेत्र म्हणून डीपीएस तलावाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे, असे ना. गणेश नाईक यांनी बैठकीत स्पष्ट केले.