राज्यभरात महिला दिनी महिलांना मोफत एसटी प्रवास; ‘तेजस्विनी एनएमएमटी बस'ला वनवास  

नवी मुंबई : राज्यभरात महिला दिनानिमित्त महिलांना महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ मार्फत ‘तेजस्विनी एसटी बस' मधून मोफत प्रवास  करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. परंतु, नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी) तर्फे ‘तेजस्विनी एनएमएमटी बस'ला वनवासात पाठविण्यात आले आहे, अशी खंत व्यवत करुन, ‘महिलांच्या सन्मानार्थ सुरु केलेली आणि आता बंद पडलेली ‘तेजस्विनी एनएमएमटी बस' पुन्हा सुरु करावी', अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी नवी मुंबई महापालिका आयुवत डॉ. कैलास शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये नागरीकरण वेगाने होत असल्याने नोकरी, व्यवसाय निमित्ताने प्रवास करणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०११ मधील जनगणेनुसार ५ लाखापेक्षा अधिक महिला नवी मुंबई शहरात असून, त्यापैकी अधिकतर महिला व्यवसाय, नोकरी यांसाठी नवी मुंबई शहरातील विविध भागात दळणवळणाची साधने वापरत गर्दीमधून प्रवास करीत असतात. महिलांचा दैनंदिन प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, महिला सक्षमीकरण व्हावे यासाठी राज्य सरकारने तेजस्विनी बस योजनेंतर्गत नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमासाठी १० तेजस्विनी बस मंजूर करुन महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च २०१९ रोजी या तेजस्विनी बस महापालिका उपक्रमाच्या तापयात समाविष्ट केल्या आहेत. सदर तेजस्विनी बस संकल्पना केवळ महिला प्रवाशांसाठी तसेच वाहक,चालक आणि प्रवासी देखील महिला आरक्षित असणार होती. गर्दीच्या वेळेत सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ या दरम्यान किंवा स्थानिक परिस्थिती आणि आवश्यकतानुसार तेजस्विनी बस चालविण्यात येणार होत्या. तसेच, इतर वेळी नियमित आसन व्यवस्थेनुसार चालविण्यात येणार होत्या. तेजस्विनी बस चालविण्यासाठी वाहक आणि चालक म्हणून महिलांची नियुक्ती करण्यात येणार होती. परंतु, काही कालावधीनंतर महापालिका अधिकाऱ्यांची उदासीनता आणि ढिसाळ नियोजनामुळे जनतेचा आणि राज्य सरकारचा कोट्यवधी रुपये निधी धूळखात अक्षरशः भंगारात पडला आहे, असे निवेदनात अधोरेखित करुन, ‘महिलांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर होण्यासाठी आणि महिलांची प्रवासात होणारी गैरसोय दुर करण्यासाठी महिला चालक आणि वाहक यांची संख्या वाढवून बंद पडलेली ‘तेजस्विनी बस' पूर्वरत सुरु करण्यात यावी', अशी मागणी महापालिका आयुक्ताकडे निलेश कचरे यांनी केली आहे.

राज्यभरात विविध महापालिका परिवहन उपक्रम तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत बस प्रवास सुविधा उपलब्ध केली होती. परंतु, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात महिलांसाठी आरक्षित तेजस्विनी बस उपलब्ध नसल्याने महिलांकडून नाराजी व्यवत केली जात आहे. तेजस्विनी बस सेवा सुरु करण्यासाठी महापालिका आयुक्तांना ५ पेक्षा जास्त वेळा स्मरणपत्र दिले आहे. परंतु, महापालिका आयुक्तांना तेजस्विनी बस सेवा सुरु करण्याबाबत गांभिर्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. - - निलेश सोमाजी कचरे, सामाजिक कार्यकर्ते - सानपाडा, नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अखेर मोरा बंदरातील गाळ काढण्यास सुरुवात