वाशी येथे पहिल्यांदाच युनेवस-सनराईज एसबीआय लाईफ इन्श्युरन्स ऑल इंडिया सब-ज्युनिअर रँकींग बॅडमिंटन स्पर्धा
वाशीत ऑल इंडिया सब-ज्युनिअर (१३ वर्षाखालील) रँकींग बॅडमिंटन स्पर्धाचे आयोजन
नवी मुंबई ः पदुकोन स्पोर्टस् मॅनेजमेंट तर्फे वाशी येथे पहिल्यांदाच युनेवस-सनराईज एसबीआय लाईफ इन्श्युरन्स ऑल इंडिया सब-ज्युनिअर (१३ वर्षाखालील) रँकींग बॅडमिंटन स्पर्धा-२०२२चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ३१ ऑवटोबर ते ६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आणि ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या सहकार्याने वाशीतील नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन (एनएमएसए) येथे पार पडणार आहे. सदर स्पर्धामध्ये देशभरातील ४४० खेळाडुंनी जवळपास ५५६ प्रवेशिका दाखल केल्या असल्याची माहिती वाशीत आयोजित पत्रकार परिषदमध्ये देण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सरचिटणीस श्रीकांत वाड, स्पर्धा आयोजन कमिटीचे सचिव तथा पदुकोन स्पोर्टस् मॅनेजमेंटचे महाव्यवस्थापक श्रीहर्षा बडे, एसबीआय लाईफ इन्श्युरन्स कंपनीचे मुंबई मेट्रो विभागीय संचालक शंतनु चट्टोराज, एनएमएसएचे सरचिटणीस डॉ. फडणीस, खजिनदार संजय निकम, प्रकाश श्रीनिवास तसेच पदुकोन स्पोर्टस् मॅनेजमेंटच्या विभागप्रमुख (ऑपरेशन) तथा माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू निर्मला कोटणीस, आदि उपस्थित होते.
सदर बॅडमिंटन स्पर्धाच्या सुरुवातीला सहभागी खेळाडुंच्या उपस्थितीत ड्रॉ काढण्यात येणार असून त्यानंतर पात्रता फेरीतून खेळाडुंची मुख्य स्पर्धेसाठी निवड होईल. स्पर्धा ४ बॅडमिंटन कोर्टवर खेळविण्यात येणार असून त्यातून विजेत्या मुले-मुली (सिंगल) यांना प्रत्येकी ३६ हजार रुपये रोख तर मुले-मुली (डबल) यांना रोख ३० हजार रुपयांचे तसेच उपविजेते आणि इतर अशी एकूण ३ लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. वरिष्ठ भारतीय बॅडमिंटन वरिष्ठ खेळाडू सतीश मल्ल्या या स्पर्धेचे मुख्य रेफ्री म्हणून काम पाहणार आहेत.
स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरील असल्याने त्याद्वारे खेळाडुंची रँकींग देखील ठरणार आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये सिंगल आणि डबल प्रकारात देशभरातील नावाजलेले आणि मानांकित सब-ज्युनिअर खेळाडू देखील सहभागी होणार आहेत.
सदर स्पर्धेचा निकाल ैैै.ूदल्ीहीसहूेदिूैीीा.म्दस् या वेबसाईटवर प्रदर्शित केला जाणार आहे.