मासळी विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

नवी मुंबई -: नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने वाशी सेक्टर १४ येथे मासळी मार्केट बांधले होते. मात्र त्या इमारतीत  तात्पुरत्या स्वरूपात वाशी विभाग कार्यालयाचे कामकाज सुरू होते. आता वाशी विभाग कार्यालय हे अग्निशमन दला जवळ प्रशस्त अशा इमारतीत स्थलांतर करण्यात आल्याने सेक्टर १४ येथील इमारतीत  प्रकल्प ग्रस्त स्थानिक  मासळी विक्रेता महिलांना जागा ऊपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील यांनी केली आहे.

 नवी मुंबई शहर वसण्याआधी येथील स्थानिक भूमिपुत्रांचा भात शेती आणि मासेमारी हा प्रमुख व्यवसाय होता. मात्र शेती गेल्याने मासेमारी हा व्यवसाय राहिला.आणि आज  हा व्यवसाय आज अखेरची घटका मोजत आहे.आज मात्र काही गावा गावात हातावर मोजण्या इतके स्थानिक  लोक मासेमारी आणि मासळी विक्री करत आहे. मात्र आजही काही गाव वगळता मनपाकडून मासळी विक्रेत्यांना मासळी विक्रीसाठी प्रशस्त अशा जागा उपलब्ध नाहीत. वाशी येथील जुहुगावातील स्थानिक मासळी विक्रेत्यांना जागेचा प्रश्न भेडसावत आहे.  नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वाशी सेक्टर १४ येथे मासळी मार्केट बनवले होते. मात्र मागील पाच सहा वर्षापासून त्या ठिकाणी वाशी विभाग कार्यालयाचे कामकाज  चालवले जात होते. मात्र आता वाशी विभाग कार्यालय सेक्टर १६ येथील अग्निशमन दलाच्या शेजारी प्रशस्त अशा इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे वाशी सेक्टर १४ येथील मासळी मार्केटची इमारत रिकामी झाली आहे. त्यामुळे सदर मासळी मार्केटमध्ये  स्थानिक प्रकल्पग्रस्त मासळी विक्रेत्या महिलांना जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर  यांच्या कडे केली आहे.

   
Read Previous

१३ ते १६मे दरम्यान वाशीत होणार क्रेडाई-बीएएनएम यांच्या २०व्या मेघा प्रॉपटी प्रदर्शन

Read Next

अवैध मासे विक्री प्रकरणी विधिमंडळ सदस्यांच्या पाहणी दौरा व बैठक संपन्न