दुर्मिळ मांजऱ्या सापाला जीवनदान        

कल्याण : कल्याण स्टेशन जवळील दत्तमंदिर परिसरातील बिल्डिंग मध्ये रात्री ३ वाजता साप शिरल्याने रहिवाशांनी ‘वॉर फॉऊंडेशन'चे सर्पमित्र सतीश बोबडे यांना संपर्क केला असता सतीश बोबडे आणि साहस बोबडे यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन सापाचा सुखरुप बचाव केला.

बचाव केलेला सर्प मांजऱ्या जातीचा असून कल्याण सारख्या रहदारीच्या ठिकाणी असा सर्प भेटल्याने सतीश बोबडे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मांजऱ्या साप अनेक वर्षांनंतर मिळाला आहे. बचाव केलेला सर्प वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली लवकरच निसर्गमुक्त करण्यात येईल, असे सर्प मित्र सतीश बोबडे यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नवी मुंबई मेट्रो'चे २० जानेवारी पासून सुधारित वेळापत्रक