पनवेल महापालिकातर्फे २३ मार्चपासून ज्युनियर केजी प्रवेश प्रक्रिया

पनवेल : पनवेल महापालिकामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता ज्युनियर केजी वर्गामध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली आहे. इच्छुक पालकांनी नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ मार्च २०२६ पासून सुरू होणार असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ एप्रिल २०२६ आहे. प्रवेश फॉर्मचे वाटप आणि स्वीकृती सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत केली जाणार आहे.

प्रवेशासाठीची लॉटरी...
ज्युनियर केजी प्रवेशासाठीची लॉटरी २७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे. चालू शैक्षणिक वर्षात ज्युनियर केजीचा एकच वर्ग सुरू करण्यात येणार असून या वर्गाची एकूण क्षमता ४० विद्यार्थ्यांची (२० मुले आणि २० मुली) असेल.

प्रवेशासाठीची पात्रता...
प्रवेशासाठी बालकाची वयोमर्यादा १ जुलै २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान जन्म झालेली असावी. तसेच ३१ डिसेंबर २०२६ रोजी बालकाचे किमान वय ४ वर्षे आणि कमाल वय ५ वर्षे ५ महिने ३० दिवस असणे आवश्यक आहे. सदर प्रवेश प्रक्रिया केवळ पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी लागू राहणार आहे.

पालकांनी दिलेली माहिती चुकीची किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

येथे करावा अर्ज...
प्रवेश अर्ज लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय, दांडेकर हॉस्पिटल आणि आगरी समाज हॉल समोर, पनवेल येथे उपलब्ध होणार आहेत. अधिक माहितीसाठी संजय गायकवाड (९९३०११९०३०),  रोशन पोपेटा (७०४५६७०१०१) आणि प्राजक्ता महाडिक (८१०८७०७४१७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रेः
बालकाचे जन्म प्रमाणपत्र.
बालकाचे आधार कार्ड.
पालकाचे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र.
पालकांचे वार्षिक उत्पन्न असलेला तहसिलदारांचा दाखला (एक लाखांपेक्षा कमी)
पालकाचे रहिवासी पुरावा म्हणून विज देयक, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक, पाणीपट्टी, घरपट्टी, रेशनिंग कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणतेही एक कागदपत्र. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

महासभेत ऐतिहासिक ठराव मंजूर