प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
नमुंमपा जिंकून शहर विकासाचा नवा अध्याय लिहिण्याची संधी - प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नवी मुंबई येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात भाजपाचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी वन मंत्री नामदार गणेश नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, निवडणूक प्रमुख तथा माजी खासदार संजीव नाईक, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
महानगरपालिका निवडणूक ही शहराच्या विकासाचा नवा अध्याय लिहिण्याची संधी आहे. नामदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये नवी मुंबई महापालिकेची निवडणूक लढली जाते आहे. लोकहित, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसमावेशक विकास हेच आपले ध्येय आहे, असे विचार व्यक्त करून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले. त्यांना ऊर्जा देण्याचे मोलाचे काम केले. नवी मुंबईतील भाजपचे कार्यकर्ते सक्षम असल्याचेही ते म्हणाले. नवी मुंबईमधील भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ देखील पार पडला. शिवसेनेसह विविध पक्षीयांचा भाजपात प्रवेश
कार्यकर्ता मेळावा प्रसंगी माजी शिवसेनेच्या माजी नगरसेविका ऋचाताई रामचंद्र पाटील तसेच शिवसेना बेलापूर संघटक रामचंद्र पाटील यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे बेलापूर विधानसभा उत्तर भारतीय संघटक कमलेश वर्मा यांनी देखील भाजपाचा झेंडा हातात घेतला. प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि नामदार गणेश नाईक यांनी या सर्वांचे भाजपात स्वागत केले.
आरपीआय गटांचा भाजपाला पाठिंबा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते सिद्राम ओव्हाळ आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते महेश खरे यांनी आज नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला पाठिंबा जाहीर केला. या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रत्यक्षात प्रचारात उतरून परिश्रम घेणार आहेत.