युरो स्कुलची नियमबाह्य फी वाढ; पालक आक्रमक

डोंबिवली : नियमबाह्य केलेली फी वाढीसंदर्भात डोंबिवली पूर्वेकडील रुणवाल गार्डन परिसरातील युरो स्कुल मधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'कडे तक्रार केली. यावर लक्ष देत ‘मनसे' पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकांसह १३ मार्च रोजी युरो स्कुलमध्ये जाऊन शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला. यावेळी शाळा व्यवस्थापनाने मनसैनिकांचे म्हणणे ऐवूÀन घेत निवेदन स्वीकारले.

यावेळी शिष्टमंडळात कल्याण लोकसभा सचिव राहुल कामत, उपजिल्हाअध्यक्ष योगेश पाटील, अरुण जांभळे, विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष धनंजय गुरव, कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव, डोंबिवली विद्यार्थी सेना शहराध्यक्ष प्रतीक देशपांडे, विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष सुरज ढोलाम, संजय चव्हाण, अजय घोरपडे, अनिकेत मोरे, मनसे शाखाध्यक्ष प्रमोद पांगम, प्रणव केणेकर यांच्यासह मनसैनिक आणि पालकांचा समावेश होता.

शाळा व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकीमध्ये फी वाढीबाबत प्रत्येक विद्यार्थ्यांना वेगवेगळी फी का आकराली जाते? असा प्रश्न यावेळी पालकांनी उपस्थित केला. वाढीव फी बाबत शाळा व्यवस्थापनाला याबाबत विचारले त्यांनी परवडत नसेल आपल्या पाल्याला शाळेतून काढून टाका, असे सांगितले.  या शाळेतील प्रिन्सिपलची बदली व्हावी, अशी आमची मागणी असल्याचेही पालक म्हणाले. तर काही पालकांनी इतर पक्षांना संपर्क केला होता. मात्र, त्यांच्याकडून सहकार्य मिळाले नाही, म्हणून आम्ही ‘मनसे'कडे धाव घेतल्याचे स्पष्ट केले.

मनसे कल्याण लोकसभा सचिव राहुल कामत म्हणाले, फी वाढीसंदर्भात आम्ही शाळा व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे. त्यांना ‘मनसे'च्या वतीने निवेदनही दिले आहे. ‘मनसे' आज फक्त जाब विचारला आहे, जर शाळा व्यवस्थापनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर मनसे आपल्या स्टाईलने उत्तर देईल, असे ‘मनसे'चे कल्याण लोकसभा सचिव राहुल कामत यांनी सांगितले.

मनसे उपजिल्हाअध्यक्ष योगेश पाटील म्हणाले, युरो स्कुलमध्ये ३० ते ४० टक्के फी वाढ करण्यात आली असून ‘मनसे'चा याला विरोध आहे. शाळा नियमाबाह्य पद्धतीने फी वाढ करत आहे, असा आमचा आरोप आहे.

तर युरो स्कुल शाळा व्यवस्थापनाने महागाई वाढली आहे, काचा स्वस्त नाहीत. त्यामुळे शाळेने योग्य नियमानुसार काम करावे, असा सज्जड दम कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे यांनी व्यवस्थापनाला दिला.

दरम्यान, लवकरच मनसे नेते तथा माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या कार्यालयात युरो स्कुल व्यवस्थापन, पालकवर्ग आणि मनसे यांची बैठक होईल. या बैठकीत निर्णय घेतला जाईल. तसेच डोंबिवलीतील ज्या ज्या शाळांनी नियमबाह्य फी वाढ केले असेल तर मनसे याचा त्यांनाही जाब विचारेल, असे याबाबत मनसे विद्यार्थी सेना डोंबिवली शहर अध्यक्ष प्रतीक देशपांडे यांनी सांगितले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

अंबरनाथ नगरपालिकेत सत्तासंघर्ष टोकाला