म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
उरण तालुका पंचायत समिती तर्फे आयोजित आमसभा संपन्न
उरण : उरण तालुका पंचायत समिती तर्फे २८ फेब्रुवारी रोजी उरण मधील जेएनपीटी मल्टिपर्पज हॉलमध्ये सकाळी ११ वाजता उरण विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली ‘आमसभा' आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी आमसभा मध्ये ‘उरण तालुका पंचायत समिती'चे गटविकास अधिकारी समीर वाठारकर, उरण तहसिलदार उध्दव कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) डॉ. विशाल मेहुल, उपजिल्हाधिकारी (मेट्रो सेंटर उरण) जनार्दन कासार, उपजिल्हाधिकारी (एमएमआरडीए) संतोष जाधव, ‘उरण नगरपरिषद'चे मुख्यधिकारी समीर जाधव, ‘उरण पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, ‘न्हावा शेवा पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ओवे, उरण तालुका गट शिक्षणाधिकारी प्रियांका म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुख नरेश पवार, वाहतूक विभाग प्रमुख अतुल दहिफळे, उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, उरण शहर भाजप अध्यक्ष कौशिक शाह, मुकुंद गावंड, सीमा घरत यांच्यासह विविध शासकीय-निमशासकीय अधिकारी आणि विविध ६२ आस्थापनांचे प्रतिनिधी, उरण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
उरण तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या सर्व समस्या सोडविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे आश्वासन यावेळी आमदार महेश बालदी यांनी उपस्थित नागरिकांना दिले.
या आमसभेत प्रामुख्याने उरण तालुवयातील सुसज्ज रुग्णालयाची गरज, वाहतूक कोंडी, वाढते अपघात, वाढती बेरोजगारी, अनधिकृत बांधकामे, अनधिकृत फेरीवाल, अनधिकृत कंटेनर यार्ड, अतिक्रमण, नादुरुस्त रस्ते, विजेचा लपंडाव, पाणीटंचाई, बेकायदा भंगार विव्रेÀते, उरण बायपास रोड, उरण ते छत्रपती शिवाजी टर्मिनल रेल्वे, वाढते रेल्वे पार्किंग दर, रेल्वे लोकलच्या अपुऱ्या फेऱ्या, दिव्यांगांना ग्रामपंचायत मधून मिळणारा ५ टक्के निधी, अटल सेतू आणि पोर्ट यामुळे मच्छिमारांचे झालेले नुकसान, राजिप शाळांची दुरवस्था, हेटवणे धरणातून होणारा अपुरा पाणी पुरवठा, माकडे आणि भटकी कुत्री यांपासून नागरिकांना होणारा त्रास, हनुमान कोळीवाडा पुनर्वसन प्रश्न, पुनाडे धरणातील गाळ आणि लिकेज आदि विषयावर चर्चा करण्यात आली.
या आमसभा मध्ये संजय ठाकूर (खोपटे), सत्यवान भगत (खोपटे), सुमित पाटील (पागोटे), कृष्णा पाटील(पिरकोन), माजी उपसभापती वैशाली पाटील, मुकुंद गावंड (पिरकोन), रमाकांत पाटील, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, ‘जासई ग्रामपंचायत'चे उपसरपंच आदित्य घरत, माजी जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील, महेश भोईर(कळंबूसरे), ममता पाटील (उरण), नरेश कोळी (हनुमान कोळीवाडा), दया परदेशी (बोरी), सीमा घरत, महेंद्र म्हात्रे, समाधान म्हात्रे (गोवठणे), संतोष ठाकूर यांच्यासह अनेक नागरिकांनी उरण तालुवयातील विविध प्रश्न सोडविण्याची मागणी केली. नागरिकांनी आमसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. याशिवाय आमदार महेश बालदी यांनीही नागरिकांना प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
२०१८ नंतर प्रथमच उरण तालुका पंचायत समिती तर्फे उरण मध्ये आमसभा आयोजिन करण्यात आली होती. त्यामुळे आमसभा मध्ये उपस्थित नागरिकांनी शासकीय-निमशासकीय अधिकारी आणि आमदार महेश बालदी यांचे आभार मानले.
दरम्यान, आमसभा मध्ये उरण तालुवयातील विविध प्रलंबित समस्यांवर नागरिकांनी आवाज उठविला. नागरिकांच्या विविध समस्यांची, प्रश्नांची दखल घेत आमदार महेश बालदी आणि विविध विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. या आमसभेत अनेक नागरिकांना प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. आता शासकीय अधिकारी उरण तालुवयातील प्रलंबित समस्या कधी आणि कशा पध्दतीने मार्गी लावणार?, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.