भैय्याजी जोशींच्या विरोधात नवी मुंबईत शिवसेनेचे आंदोलन

नवी मुंबई :  घाटकोपरची भाषा गुजराती आहे. मुंबईत राहणार्‍या प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आली पाहिजे असे नाही, अशी मुक्ताफळे उधळणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी  यांचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीने 7 मार्च रोजी निषेध करण्यात आला. जोशी यांच्यावर कारवाई करण्यासाठी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करणारे  राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांना अटक करण्याची मागणीही यावेळी आंदोलकांनी केली.

वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख अतुल कुळकर्णी, संतोष घोसाळकर, प्रकाश पाटील, मनोज इसवे, शहरप्रमुख काशिनाथ पवार, महानगरप्रमुख सोमनाथ वास्कर, उपजिल्हा संघटक आरती शिंदे, नरेश चाळके, सुनिल गव्हाणे, महेश कोटीवाले, संदीप पवार, अजय पवार, विजय चांदोरकर, राकेश मोरे, मारुती चौगुलें, अतुल डेरे, सिध्दराम शिलवंत, स्मिता धमामे, वंदना घोडसे, निखील मांडवे आदी सहभागी झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने वाशीचा सर्वच परिसर दणाणून गेला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

२७ गावांच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी अतिरिक्त २५० कोटींची मागणी