जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

कल्याण : ‘केडीएमसी'च्या अ प्रभाग क्षेत्रातील आंबिवली स्टेशन नजिक असणाऱ्या वाल्मिकी शाळा रस्त्यावर जलवाहिनी बाधित झाल्याने लाखो लीटर पाणी वाया जात असून, विद्यार्थ्यांना चिखलातून पाण्यातून वाट काढीत शाळेत ये-जा करावी लागत आहे. समन्वय अभावामुळे गेल्या ४ दिवसापासून प्रशासन भिंजत घोगंडे कारभार समोरा येत असून प्रशासन कधी समस्या मार्गी लावणार? अशी मागणी यानिमित्ताने होत आहे.                                    

आंबिवली स्टेशन नजिक वाल्मीकी शाळा रस्ता परिसरात गेल्या ३-४ दिवसापासून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. अमृत अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामात जुनी लाईन बाधित झाल्याने लिकेजमुळे लाखो लीटर पाणी वाया जात असून समन्वय अभावामुळे समस्या मार्गी लागत नसल्याचे चित्र दिसत आहे. या संदर्भात माजी नगरसेवक दशरथ तरे यांनी अ प्रभागाचे पाणी पुरवठा उप-अभियंता उदय सूर्यवंशी यांना संपर्क साधला असता त्यांनी अमृत अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु असून ती जबाबदारी त्यांची असल्याचे सांगत अंग काढले.

तर या कामामुळे जुनी लाईन बाधित झाल्याने लिकेजमुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे रस्त्यालगत चिखलाचे साम्राज्य झाले असून लिकेजमुळे पाणी वाल्मिकी शाळेच्या मैदान रस्त्यावर साचत असल्याने या साचलेल्या पाण्यातून विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे सदरचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी जोर धरु पाहत आहे.    

यासंदर्भात अ-प्रभागाचे पाणी पुरवठा उप-अभियंता उदय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला लिकेज दुरुस्ती काम सोमवारी करण्यात आले असून रस्ता दुरुस्ती संदर्भात अमृत विभागाशी संपर्क केला आहे. अमृत प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी यांच्याशी रस्ता दुरुस्ताबाबत संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

समस्यांच्या विळख्यात पुनाडे धरण