अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

कल्याण : अंमली पदार्थ विक्री आणि तस्करी विरोधात ठाणे पोलीस आयुवतालय परिमंडळ-३ कल्याणच्या पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. गांजा तस्करी प्रकरणी महात्मा फुले पोलीस आणि कल्याण वाहतूक पोलिसांच्या पथकाने याप्रकरणी एका आंतरराज्यीय टोळीचा छडा लावत ८ मोक्काअंतर्गत सराईत आरोपींना गजाआड केले आहे. तर यातील आणखी ६ आरोपींचा कसून शोध घ्ोतला जात आहे. याबाबतची माहिती पोलीस उपायुवत अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदमध्ये दिली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे ऑगस्ट महिन्यात महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आणि कल्याण शहर वाहतूक पोलिसांकडून कल्याण पश्चिमेच्या बळीराम सिंग परदेशी आणि वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे यांच्या नेतृत्वाखाली वालधुनी परिसरात नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यावेळी संशयास्पदरित्या आलेली छत्तीसगड ०८ एएम ९४०१ क्रमांकाची बलेनो कार पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पण, चालकाने कार न थांबवता ती भरधाव वेगात पुढे नेली. त्यावेळी आरोपी कार चालकाने पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या पथकाने काही अंतरावर पुढे जाऊन कार अडवून तपासणी केली असता त्यामध्ये ३५ किलो गांजा आणि एक गावठी पिस्तुल आढळून आल्याची माहिती पोलीस उपायुवत अतुल झेंडे यांनी दिली.

या कारमधील मोहम्मद सरफराज मोहम्मद आसिफ याच्यासह मोहम्मद रफीक शेख, फैजान शेख, समीर अली, आसिफ सय्यद या ५ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडील चौकशीत शाहीद अब्दुलगनी शेख, शाहीद शेख आणि रवींद्र मिर्धा या भिवंडी, नागपूर आणि ओडिसा राज्यातील आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. सदर टोळी नागपूर, अमरावती, भंडारा तसेच ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करीसाठी सक्रिय असल्याचे तसेच त्यांच्यावर नागपूर शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस ठाण्यात एनडीपीएस अंतर्गत ४० पेक्षा गुन्हे दाखल असल्याचेही झेंडे यांनी यावेळी सांगितले.

सदर कारवाई पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घ्ोटे, महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सिंग परदेशी, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस निरीक्षक विजय नाईक, पोलीस उपनिरीक्षक विकास मडके, पोलीस हवालदार महेंद्र मंझा, थेरे आणि वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे, पोलीस शिपाई सोनवणे यांच्या पथकाने केली आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अंबरनाथमध्ये १० बंधबिगार कामगारांची सुटका