सिडकोच्या भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रीज टाकणाऱ्या 3 डंपर चालकावर कारवाई    

नवी मुंबई : सिडकोने संपादित केलेल्या जमीनीवर व भूखंडावर मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानिकारक असलेले डेब्रीज करणाऱ्या डंपर चालकांची सिडकोकडून धरपकड सुरुच आहे. सिडकोच्या पथकाने गत शनिवारी सायंकाळी उलवे परिसरात सिडकोच्या जमिनीवर डेब्रिज टाकण्याच्या तयार असलेल्या 3 डंपरवर कारवाई करुन ते जफ्त केले आहेत. तसेच सदर डंपरवरील चालकांना ताब्यात घेतले आहे.    

सिडको महामंडळाने संपादित केलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे मोठया प्रमाणात डेब्रीज टाकण्यात येत असून सदरचे डेब्रीज हे मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानीकारक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सिडकोच्या भूखंडावर टाकण्यात येणाऱ्या अनधिकृत डेब्रीजला आळा घालण्याच्या दृष्टीने सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचे दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रीकी विभाग व पोलीस पथकाकडून सिडकोच्या जमिनीवर अनधिकृतपणे डेब्रीज टाकणाऱ्या डंपर चालकांविरोधात कारवाई करण्यात येत आहे.      

गत शनिवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू मार्गे उलवे शिवाजीनगर जवळ काही डंपर चालक डेब्रिज खाली करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सिडकोच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सिडकोच्या पथकाने उलवे परिसरात धाव घेतली असता, त्याठिकाणी 3 डंपरमधील मानवी आरोग्यास व हानिकारक असलेले डेब्रीज विनापरवाना खाली करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यानंतर सिडकोच्या पथकाने तिन्ही डंपर ताब्यात घेऊन डंपर चालक पकंज पाल (24), 2) शकील अहमंद सिध्दकी (31) व मोहमंद अन्सार (48) या तिघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाई नंतर सिडकोच्या पथकाने बेकायदेशीरपणे डेब्रिज टाकणाऱया विरोधात न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी फळ बाजारात अस्वच्छतेचा बाजार?