प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
महापालिका निवडणुकीमध्ये ‘भाजपा महायुती'चा षटकार
पनवेल : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्दर्शनाखाली तसेच आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिका निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत ‘भाजपा महायुती'चे ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे या निवडणुकीत ‘भाजपा महायुती'ने विजयाचा षटकार मारला आहे.
यामध्ये विजयाचा पहिला विजयश्रीचा मान प्रभाग क्र.१८ मधील नितीन जयराम पाटील यांनी मिळवता होता. त्यानंतर २ जानेवारी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५ विरोधी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यानुसार महापालिका प्रभाग क्र.१८ मधून ममता प्रितम म्हात्रे, प्रभाग क्र.१९ मधून दर्शना भगवान भोईर, रुचिता गुरुनाथ लोंढे, तर प्रभाग क्र.२० मधून अजय तुकाराम बहिरा, प्रियांका तेजस कांडपिळे यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. या सर्व विजयी शिलेदारांचा निवडणूक प्रभारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करुन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिका माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, गणेश कडू, राजेंद्र पाटील, ‘महिला मोर्चा'च्या माजी तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, एकच वादा प्रशांतदादा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्तपणे विजयाचा जल्लोष साजरा केला.
‘पनवेल'च्या विकासासाठी नागरिकांनी ‘भाजपा महायुती'वर दाखवलेला विश्वास अधिक जबाबदारीने पेलत पनवेल शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार यावेळी ‘महायुती'च्या नेत्यांनी व्यक्त केला. या बिनविरोध निवडीमुळे ‘भाजपा महायुती'मध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण पसरले असून विरोधकांना मात्र मोठा हादरा बसला आहे.