बेघरांचा निवाऱ्यासाठी उड्डाणपुलांखाली आसरा

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील बेघरांचा अनधिवृÀत निवारा हटविण्यासाठी महापालिका अतिक्रमण विभागाने पुन्हा मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत सीवुडस्‌-दारावे येथील उड्डाणपुलाखाली बस्तान मांडलेल्या बेघरांच्या (भिकारी) वसाहतीवर कारवाई करीत महापालिकेने त्यांना तेथून हटविले. दरम्यान, महापालिकेने या बेघरांवर कारवाई करुन उड्डाणपुलाखालचा परिसर मोकळा केला असून शहरातील काही नागरिकांकडून शहर स्वच्छ, सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाने सातत्याने अशाच कारवाया करण्याची मागणीही होत आहे.  तर दुसरीकडे बेघर नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप कायम आहे. विशेषतः बेघर महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कायमस्वरुपी निवाऱ्याची व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत आहे. कारवाई केल्यानंतर काही दिवसांतच सदर लोक पुन्हा त्याच ठिकाणी परततात. त्यामुळे या बेघरांसाठी शासन-प्रशासनानेच कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाशी, नेरुळ, सीवुडस्‌, सानपाडा आणि बेलापूर परिसरातील उड्डाणपुलांखाली मोठ्या प्रमाणात भिकाऱ्यांनी आणि बेघर लोकांनी ठाम मांडले होते. यामुळे परिसरात अस्वच्छता (लघवी, शौच, कचरा) पसरली होती, तसेच पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले होते. या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साचत होता. पुलाखालील साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती, ज्यामुळे महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानात अडथळे येत आहेत. तसेच रात्रीच्या वेळी या भागात असुरक्षिततेची भावना वाढत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी वारंवार केलेली आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई शहरातील शहरातील स्वच्छता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी विविध उड्डाणपुलांखाली बस्तान मांडून बसलेल्या भिकाऱ्यांवर आणि बेकायदा झोपड्यांवर महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे.

तक्रारीच्या अनुषंगाने 9नमुंमपा”च्या अतिक्रमण विभागाने नेरुळ, बेलापूर आणि एनआरआय पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई केली. यावेळी उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटवत तेथील तात्पुरते निवारे आणि साहित्य हटविण्यात आले असून एकूण ६ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.

यापूर्वी नवी मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वीच सानपाडा उड्डाणपुलाखालील अतिक्रमणांवर धडक कारवाई केली होती. मात्र, अवघ्या २४ ते ४८ तासांच्या आत सदरचे चित्र पुन्हा बदलले जाऊन सदर ठिकाणी भिकाऱ्यांनी पुन्हा एकदा आपले बस्तान मांडले आहे. यामुळे महापालिकेची कारवाई केवळ 9दिखावा” होती का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.सद्यस्थितीत सानपाडा हायवे-उड्डाणपुल, वाशी सेंटर वन सिग्नल, जुईनगर रेल्वे स्थानकासमोरील सर्व्हिस रोड, तुर्भे नाका, घणसोली याठिकाणी बेघरांनी बस्तान याठिकाणी आता रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या महिला आणि प्रवाशांना पुन्हा असुरक्षित वाटू लागले आहे. पुलाखालील आणि समोर महामार्गालगत मोकळ्या जागेत पुन्हा कचरा आणि दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत येथे कायमस्वरुपी सुरक्षा रक्षक किंवा लोखंडी जाळ्यांचे मजबूत कुंपण घातले जात नाही, तोपर्यंत सदरचा प्रश्न सुटणार नाही, अशी प्रतिक्रिया सानपाड्यातील रहिवाशाने दिली.

तत्कालीन आयुवत अभिजीत बांगर यांच्या कार्यकाळात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सानपाडा उड्डाणपुलाखालील बेकायदा झोपड्या आणि भिकाऱ्यांच्या वस्त्यांविरुध्द वेळोवेळी कडक पावले उचलली आहेत. कारवाईनंतर सानपाडा उड्डाणपुलाखाली भिकाऱ्यांनी पुन्हा पुन्हा वस्ती करु नये यासाठी महापालिकेने पुलाखालील मोकळ्या जागेत सुमारे ११ फुट उंच लोखंडी जाळ्यांचे कुंपण लावले आहे. तसेच वुÀंपण इतर उड्डाणपुलांखाली देखील लावण्यात आलेले आहेत. नुसती कारवाई करून सदर लोक जात नसल्याची बाब लक्षात घेऊन आता पुलाखाली व्हर्टिकल गार्डन (उभी उद्याने) किंवा पेव्हर ब्लॉक्स लावून ती जागा अशा प्रकारे विकसित केली जात आहे की तिथे कोणालाही झोपता येणार नाही.

दुसरीकडे महापालिकाकडून बेघरांसाठी बेलापूर, घणसोली आणि इतर ठिकाणी रात्र निवारा उपलब्ध करुन दिला असून, पुलाखाली राहणाऱ्यांना तेथे स्थलांतरीत होण्याचे आवाहन केले जात आहे.

महापालिका अथवा शासन-प्रशासनाने अशा बेघर नागरिकांबाबत थेट करावाई करणे चुकीचे वाटत आहे. यामध्ये काही अपप्रवृत्ती, गुंड, गदर्ुल्ले असतील तर सर्वप्रथम त्यांचा बिमोड करायला हवा. तसेच आज महापालिकेच्या बेघर निवारा वेंÀद्रात काही मोजवयाच बेघरांना ठेवण्याची व्यवस्था असून ती फवत दिवसभरापुरती आहे. मग, कारवाईनंतर ते पुन्हा त्याच जागी आपले बस्तान मांडणारच. पोलीस प्रशासनाने फवत महामार्ग आणि रस्त्यालगत मुला-बाळांसह संसार थाटणाऱ्यांवर महापालिकेच्या माध्यमातून अंवुÀश ठेवायला हवा.
-सोमनाथ वास्कर, माजी नगरसेवक-शिवसेना.

बेकायदेशीरपणे उड्डाणपुलाखाली अथवा महामार्गालगत किंवा अन्य जागी वास्तव्य करणाऱ्या बेघर, भिकारी यांच्या विरोधात आमची कारवाई सातत्याने सुरु असते. या घटकांवर कायदेशीर कारवाई करताना अडचणी खूप येतात. तसेच बेघरांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करताना प्रशासनासमोर मर्यादा येतात. घणसोली येथील बेघर निवार केंद्रामध्ये मर्यादित व्यवतींनाच व्यवस्था आहे. त्यामुळे उर्वरित बेघरांचे करायचे काय? असा प्रश्न आमच्यासमोर कायम आहे. शिवाय ज्यांच्यावर आम्ही कारवाई करतो, ते पुन्हा काही तासांनी त्याच जागी बस्तान मांडत असल्याचे निदर्शनास येत आहे.

- सागर मोरे, सहाय्यक आयुवत-तुर्भे विभाग. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे शहरात धावणार डबल डेकर बस