लोकनेते ‘दिबां'चा वसा पुढे नेणार - लोकनेते रामशेठ ठाकूर  

पनवेल : लोकनेते दि. बा. पाटील यांनी दिलेला वसा आपल्याला पुढे चालवायचा आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिवाजीनगर येथे विविध विकास कामांच्या शुभारंभावेळी केले.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या मार्गी लावण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत अनेक विकासाची कामे केली आहेत. त्यानुसार त्यांच्या स्वनिधीतून पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर गावातील रस्त्याचे काँक्रिटीकरण, अंतर्गत आरसीसी गटार आणि नविन पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्यात आली आहे. या सर्व कामांचे उद्‌घाटन आणि शिवाजीनगर गावाची बांधण्यात येणाऱ्या कमानीचे भूमीपुजन ‘भाजपा'चे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ६ ऑवटोबर रोजी करण्यात आले.

लोकनेते दि. बा. पाटील आणि स्वर्गीय जनार्दन भगत यांनी दिलेल्या संस्कारातून आम्ही घडलो आणि मोठे झालो. त्यांनीच आम्हाला चांगले कार्य करण्याच्या सवयी लावल्या असल्याचे सांगून त्यांनी जे आंदोलनाचे बीज रोवले ते आम्ही अजुनही चालू ठेवल्याचे सांगितले. तसेच ज्या प्रकारची विकासाची कामे आत्ता पर्यंत झाली तशीच कामे येणाऱ्या काळातही करत राहणार, अशी ग्वाही दिली.

गव्हाण परिसरामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अनेक विकास कामे केली. जिथे सरकारचा निधी उपलब्ध होऊ शकत नाही, त्या ठिकाणी ठिकाणी त्यांनी पुढाकार घेऊन विभागाचा विकास केला. आपल्या परिसरामधील सर्व शाळा चांगल्या दर्जाच्या असल्या पाहिजेत, त्याठिकाणी चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी आवश्यक ती ताकद रामशेठ ठाकूर यांनी लावली आहे. जे आपण करु ते चांगले आणि उत्तम झाले पाहिजे, अशी भावना त्यांनी ठेवल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यावेळी म्हणाले.

सदर कार्यक्रमाला ‘भाजपा'चे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ‘काँग्रेस'चे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, भाजपा ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पंचायत समिती माजी सदस्य भाऊशेठ पाटील, शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णा ठाकूर, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, ‘गव्हाण'चे माजी उपसरपंच विजय घरत, हेमंत ठाकूर, सचिन घरत, रतन भगत, विश्वनाथ कोळी, वसंतशेठ पाटील, जयवंत देशमुख, ‘न्हावे'चे सरपंच विजेंद्र पाटील, सागर ठाकूर, सी. एल. ठाकूर, सुधीर ठाकूर, मीनाक्षी पाटील, रमाकांत म्हात्रे, राजकिरण कोळी, नंदा ठाकूर, शशिकांत ठाकूर, सागर ठाकूर, ‘कामगार मोर्चा'चे प्रदेश सचिव संजय भगत, नरेश मोकळ, गव्हाण ग्रामपंचायत प्रशासक महेश घबाडी, विजय कुमार राठोड, गजानन ठाकूर, विजय ठाकूर, सुजित ठाकूर, किशोर ठाकूर, धनंजय ठाकूर, किशोर पाटील, शनिदास ठाकूर, श्रीराम ठाकूर, शशिकांत ठाकूर, चिंतामण ठाकूर यांच्यासह पंच कमिटी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई विमानतळासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याला मंजुरी