म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
ठाणे परिवहन सेवेचे देशपातळीवर नाव
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या महिला वाहक स्वप्नगंधा घाटे यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य रस्ते वाहतूक उपक्रम संघटना, नवी दिल्ली (ASRTU) या संस्थेने त्यांचा सन्मान केला. माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या हस्ते स्वप्नगंधा घाटे यांना सन्मानित करण्यात आले.
महिला वाहक स्वप्नगंधा स्वप्नील घाटे (वाहक क्रमांक-२००६) या सन २०२० पासून बस वाहक या पदावर ठाणे परिवहन सेवेत कार्यरत आहेत. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने नियुक्त केलेले कत्रांटदार मे. अपूर्वा महिला सामाजिक संस्थेच्या माध्यमातून स्वप्नगंधा घाटे परिवहन सेवेत काम करीत आहेत. स्वप्नगंधा घाटे यांनी आजपर्यंत अत्यंत प्रामाणिक आणि निष्कलंक सेवा ठाणेकर नागरिकांना देत आहेत.
स्वप्नगंधा घाटे यांच्या कार्यसन्मानामुळे ठाणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ठाणे परिवहन सेवेचे नाव देशपातळीवर पोहोचले आहे. याबद्दल स्वप्नगंधा घाटे यांचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी देखील अभिनंदन केले आहे.