‘बोलीभाषा या अभिजात मराठीसाठी पोषक' - प्रा. प्रतिभा सराफ

नवी मुंबई : बोलीभाषा अभिजात मराठी भाषेसाठी पूरक असल्याचे मत ज्येष्ठ लेखिका प्रा. प्रतिभा सराफ यांनी व्यवत केले. १२ एप्रिल रोजी नेरुळ येथील एन. आर. भगत स्कुल सभागृहात रंगधनु प्रकाशित, गज आनन म्हात्रे लिखित ‘आउसी गोस्ट' या लघुकथा संग्रहाचे प्रसिद्ध साहित्यिक डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर डॉ. बाळासाहेब लबडे, नामदेवजी भगत, कौमुदी गोडबोले, प्रा. प्रतिभा सराफ, लेखक गज आनन म्हात्रे उपस्थित होते. सराफ यांनी यावेळी आउसी गोस्ट' या आगरी बोलीतील कथांची वैशिष्ट्ये सांगितली.

प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष डॉ.लबडे यांनी बोलीभाषा आणि ज्ञानेश्वरीतील संदर्भ सांगून, विविधांगी लिखाण केल्याबद्दल म्हात्रे यांचे कौतुक केले. प्रा.दुर्गा देशमुख यांनी सुरेल आवाजात स्वागत गीत म्हटले. नवरंगचे कार्यवाह घनश्याम परकाळे यांनी नवरंग मंडळ वाटचालीचा आढावा घेतला. नवरंगचे सल्लागार प्रा. अजित मगदुम यांनी म्हात्रे यांच्या लेखन कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या. नवरंगचे अध्यक्ष लेखक गज आनन म्हात्रे यांनी आपल्या पुस्तक प्रवासाचा आढावा घेऊन पुढील संकल्प सांगितला. नेते नामदेवजी भगत यांनी आपण शाळा कशी उभारली याची माहिती दिली. लेखिका कौमुदी गोडबोले यांनी ‘आउसी गोस्ट' मधील कथांचे विश्लेषण करून त्यातील साहित्य सत्वाचा परामर्श घेतला. प्रा.चंद्रकांत मढवी यांनी लेखक गज आनन म्हात्रे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालनाची बाजू सौ.सुचल जाधव यांनी सांभाळली. सदर कार्यक्रमास ज्येेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विकास साठे, तसेच अरविंद वाळवेकर, अजय माढेकर, डॉ. अविनाश पाटील,  गजानन परब, रूपाली लटके, दिलीप आमले, ललित पाठक, महादेव देवळे, नितिन पवार, नवदुर्गा पवार, कवी कृष्णकांत सपकाळ, उत्तमराव तरकसे आदि उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आदिवासी पाड्यातील टेहळणी मनोरे बनले खेळाची साधने