प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा दिव्याखाली अंधार!
तुर्भे : गेल्या काही महिन्यांपासून बेलापूर येथील नवी मुंबई महापालिका मुख्यालय समोरील नादुरुस्त दिशादर्शक फलक दुरुस्त केला जात असल्याने महापालिका प्रशासनाचा ‘दिव्याखाली अंधार' असाच कारभार चालू असल्याचे चित्र दिसत आहे.
महापालिका मार्फत नवी मुंबई शहरात रस्ते, पदपथ, सुसज्ज इमारती, उद्यान, मैदान मोठ्या प्रमाणात बनवण्यात आले आहेत. यासाठी महापालिकेकडून करोडो रुपयांचा खर्च केला जात आहे नवी मुंबई शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी संबंधित विभागाचे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. यासाठी देखील महापालिका मार्फत वर्षाला लाखो रुपयांचे कंत्राट देण्यात येत असते. सध्या गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबई शहरातील सीबीडी, नेरुळ, जुईनगर, वाशी, ऐरोली, कोपरखैरणे आदी ठिकाणच्या दिशादर्शक फलकांची वाताहत झाली आहे. बेलापूर येथील महापालिका मुख्यालय समोरील रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे. या फलकावरील रेडियमद्वारे लिहिलेली माहिती ऊन, वारा, पावसामुळे निघाली आहे. विशेष म्हणजे महापालिका मुख्यालयातील सर्व कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकारी याच मार्गावरुन पनवेल आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात असतानाही गेल्या अनेक महिन्यांपासून बेलापूर येथील महापालिका मुख्यालय समोरील रस्त्यावरील नादुरुस्त दिशादर्शक फलक कोणाच्याही नजरेस न पडल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बेलापूर येथील नवी मुंबई महापालिका मुख्यालयाची इमारत नवी मुंबई शहरासाठी भूषणावह बाब असताना या इमारतीसमोरील खराब झालेला दिशादर्शक फलक दुरुस्त करण्यास महापालिका प्रशासनाकडून हलगर्जीपणा होण्याची बाब खेदजनक असल्याची चर्चा नवी मुंबई शहरातील जनतेमध्ये सुरु आहे.