नमुंमपा चषक ४०प्लस क्रिकेट स्पर्धेत दिवा कोळीवाडा, युनायटेड स्पोर्टस्‌ विजयी

नवी मुबई : नवी मुंबई महापालिका क्रीडा-सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित ४० प्लस मास्टर्स क्रिकेट स्पर्धेत ग्रामीण गटातून दिवा कोळीवाडा तर शहरी भागातून युनायटेड स्पोर्टस्‌ ऐरोली यांनी बाजी मारली.

२८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधी नवी मुंबई महापालिका चषक ४० प्लस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन बेलापूर येथील मैदानावर करण्यात आले होते. ‘४० प्लस क्रिकेट असोसिएशन'च्या सहकार्याने आण त्यांच्याकडील नोंदणीकृत गावकी (ग्रामीण) ३३ आणि शहरी २४ अशा दोन गटातील एकूण ५७ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेचा शुभारंभ ना. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या स्पर्धा  दोन्ही गटातील संघांना बाद पध्दतीने खेळवण्यात आले.

या स्पर्धेत गावकी गटामध्ये उपांत्यफेरीचा सामना दिवा कोळीवाडा ४०प्लस विरुध्द तळवली ४० प्लस संघ यांच्यामध्ये झाला. तर दुसरा उपांत्यफेरीचा सामना खारीगाव ४० प्लस संघ विरुध्द बोनकोडे ४० प्लस संघ यांच्यामध्ये झाला. अंतिम फेरीचा सामना खारीगाव संघ अणि दिवा कोळीवाडा या संघात झाला. यामध्ये दिवा कोळीवाडा संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ षटकात ७१ धावांचेे लक्ष ठेवले. यामध्ये खारीगाव संघास २८ धावांनी नमवत दिवा कोळीवाडा संघ अंतिम विजेतेपद पटकाविले.

शहरी गटामध्ये अंतिम फेरीचा सामना युनाटेड स्पोर्टस, ऐरोली आणि एसडी ११नेरुळ या संघात झाला. यामध्ये युनायटेड स्पोर्टस, ऐरोली संघाने प्रथम फलंदाली करत ५ षटकात १०९ धावांचे मोठे आव्हान उभे केले. अखर एसडी ११ संघाला ६३ धावांपर्यंत रोखून युनायटेड स्पोर्टस्‌ संघाने अंतिम विजेतेपद पटकाविले.

या स्पर्धेत गावकी विभागात मालिकावीर म्हणून प्रेमानंद केणी-दिवा कोळीवाडा, उत्कृष्ठ फलंदाज जनार्दन कवळे-खारीगांव, उत्कृष्ठ गोलंदाज संदीप पाटील-तळवली, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक सोमनाथ पाटील-बोनकोडे यांना सन्माचिन्ह देवुन सन्मान करण्यात आला.

त्याचबरोबर शहरी विभागात मालिकावीर म्हणून मारको-युनायटेड स्पोर्टस्‌, उत्कृष्ठ फलंदाज फिरोज खान- एसडी ११, उत्कृष्ठ गोलंदाज राजू- युनायटेड प्लस, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक दत्ता मोहिते-युनायटेड प्लस यांना क्रीडा विभागाच्या उपायुवत अभिलाषा पाटील, ‘४० प्लस मास्टर्स क्रिकेट असोसिएशन'चे अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष नरेश गौरी, खजिनदार मनोज म्हात्रे, सचिव विकास मोकल, शहरी उपाध्यक्ष सुरेश राणाजी, आदिंच्या हस्ते चषक देवुन गौरविण्यात आले. 

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार

Read Next

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ‘सचिन तेंडुलकर क्रिकेट ॲकॅडमी'तर्फे विनामूल्य क्रिकेट प्रशिक्षण