पूर्वीचे स्थगिती तर आताचे प्रगती सरकार! - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : एखाद्या व्यक्तीला शब्द दिला तर तो पूर्ण करतो, असे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आणि अनुभवले आहे. पूर्वीचे सरकार स्थगिती होते तर विद्यमान ‘महायुती'चे सरकार प्रगतीचे आणि समृध्दीचे आहे, असा दावा शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केला.

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह अहिल्यानगर मधील श्रीरामपूर येथील शेकडो तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर मधील सुमारे ७०० कार्यकर्त्यांनी ७ जून रोजी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात ना. एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे आदी उपस्थित होते.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन आपण चाललो आहे. मुख्यमंत्री असताना राज्यात लाडकी बहिण, लाडका भाऊ, लाडके शेतकरी आणि ज्येष्ठांसाठी कल्याणकारी योजना राबवायला सुरुवात केली. त्यामुळेच ‘महायुती'ला गेल्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत मिळाले. आताही ‘महायुती'ची दुसरी इनिंग सुरु आहे. राज्याचा विकास, प्रगती झाली पाहिजे आणि सर्वसामान्य माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे, या हेतूने सरकार काम करत आहे, असे यावेळी ना. एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

माजी आमदार भानुदास मुरकुटे, नीरज मुरकुटे, संजय छल्लारे, सिध्दांत छल्लारे, लक्ष्मण कुमावत, भगवान उपाध्ये, शेखर दुब्बैया, तेजस बोरावके, रोहित नाईक, संजय साळवे, संजय परदेशी, महेंद्र टाटिया यांच्यासह श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील शेकडो सहकारी, अनेक माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिप सदस्य,  सरपंच, उपसरपंच तसेच शेकडो सामाजिक कार्यकर्ते, विदर्भ शिक्षक संघटनेचे डॉ. दिलीप सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना मध्ये प्रवेश केला. शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे आणि प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वात शहापूर तालुक्यातील शिवसेना (उबाठा) मधील जवळपास ७०० कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला. तसेच लातूरमधील महिलांनी ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना मध्ये प्रवेश केला.

उच्चशिक्षित तरुण राजकारणात येणे काळाची गरज

धनुष्यबाण हाती घेणाऱ्या भानुदास मुरकुटे यांचा नातू नीरज मुरकुटे याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी यावेळी विशेष कौतुक केले. नीरज मुरकुटे ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन आला आहे. त्याने शिवसेनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. समाजाच्या दृष्टीने उच्चशिक्षित पिढी राजकारणात येणे, काळाजी गरज आहे, असे ना. एकनाथ शिंदे म्हणाले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबई महापालिका लोकाभिमुख करणार -खा. नरेश म्हस्के