नो-पार्किंग'मधील पोलिसांच्या वाहनांवर कारवाई

कल्याण : कल्याण स्टेशन परिसरात नो-पार्किंग मध्ये पार्क केलेल्या दुचाकीवर वाहतूक पोलिसांनी कारवाइ चा बडगा उगरला. त्यामध्ये ‘नो-पार्किंग'मध्ये पार्क केलेल्या पोलिसांच्या दुचाकीवर देखील कारवाई करुन वाहतूक पोलिसांची कारवाई  सर्वासाठी एकच, असे चित्र यानिमित्ताने दिसले.

कोणत्याही कामाची सुरुवात आपल्या घरापासून करावी आणि याचे ज्वलंत उदाहरण कल्याणच्या वाहतूक विभागाने ९ ऑवटोबर रोजी केलेल्या कारवाईत पहायला मिळाले.

पोलीस कर्मचाऱ्यांसाठी कोणतेही नियम नसतात का? आणि नियम मोडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही? असे प्रश्न अनेकदा विचारले जातात. मात्र, आता कल्याण वाहतूक विभागाने नो-पार्किंग' क्षेत्रात उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर देखील दंड आकारुन शिस्तीच्या दिशेने एक आदर्श पाऊल उचलले आहे.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी नेहमीच त्रासदायक मुद्दा राहिला आहे. या भागात बिनधास्त रिक्षा, मोठी वाहने आणि अव्यवस्थितपणे पार्क केलेल्या दुचाकींमुळे वाहतूक ठप्प होते. परिस्थिती आणखी बिकट होते, जेव्हा पोलिसांच्या दुचाकीही निष्काळजीपणे नो-पार्किंग'मध्ये उभ्या केल्या जातात.

या समस्येची गंभीर दखल घेत वाहतूक विभागाने स्वतः पोलिसांच्या वाहनांवर कारवाई करत चलान केले आहे. स्टेशन परिसरात नो-पार्किंग'मध्ये उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनांवर मोठ्या प्रमाणावर दंड आकारण्यात आला आहे.

दरम्यान, यापूर्वी अशी तक्रार होती की, ट्रॅफिक पोलीस फक्त सामान्य नागरिकांवर कारवाई करतात. परंतु, आता स्वतःच्या विभागावर शिस्त लावण्याचा प्रयत्न कौतुकास्पद मानला जात आहे. सदर उपक्रम पुढेही सुरु राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोजागिरीच्या गजल मैफलीत रसिक मंत्रमुग्ध