म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
विचुंबे-पनवेल येथील पोपटी संमेलनास चांगला प्रतिसाद
पनवेल : कोकण मराठी साहित्य परिषद पनवेल शाखेच्या पुढाकाराने ५ मार्च रोजी विचुंबे गावाजवळील शेतमळ्यावर पोपटी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी या संमेलनांना मिळणारा कवी, साहित्यिक, राजकारणी, उद्योजक मंडळींचा वाढता प्रतिसाद पाहुन रात्रीच्या वेळची अशी पोपटी कविसंमलने भविष्यात अधिक प्रमाणावर घेता येतील असे विचार व्यवत केले.
पोपटीची कल्पना रुजविल्याबद्दल प्रा.एलबी.पाटील आणि सातत्याने आयोजन करणारे पत्रकार गणेश कोळी यांचे म्हात्रे यांनी अभिनंदन केले. दर्शना माळी यांच्या सुरेख सूत्रसंचालनाने सजलेल्या या संमेलनात प्रवीण बोपुलकर, गझलकारा ज्योत्स्ना राजपूत, विनोद भांडारकर, गोपाळ शेळके, गुणवंत पाटील, अनिल भोईर, अक्षता गोसावी अशा ३७ कवींनी कविता सादर केल्या. यावेळी विचारमंचावरील मान्यवरांना सन्मानचिन्ह, शाल आणि सर्व कवींना कोमसापचे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह तसेच विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांना शाल, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी रायगडचे जिल्ह्याचे वैशिष्ट्य असणारी पोपटी शिजवून सर्वांनी तिचा सामुहिकरित्या आनंद लुटला. याप्रसंगी सर्व उपस्थितांकरिता भोजनाचीही व्यवस्था आयोजकांनी केली होती. विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, सदस्य अनिल भोईर यांनी व्यवस्थापनाची बाजू सुयोग्यरित्या सांभाळली. विलास पुंडले, गणेश म्हात्रे, रामदास गायधने, स्मिता गांधी, गुरुनाथ म्हात्रे, इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.